Tuesday, October 27, 2026

अभिषेक शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना फोडला घाम, 35 चेंडूत ठोकलं झंझावती शतक

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माचा झंझावात पाहायला मिळाला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडल. त्याने अवघ्या 35 चेंडूत शतक साजरं केलं.

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्मा नावाचं वादळ घोंघावलं. न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठई 198 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे अभिषेक शर्माकडून आक्रमक खेळीची अपेक्षा होती. त्याने केलंही तसंच.. पहिल्या षटकापासूनच त्याने आक्रमक बाणा अवलंबला होता. न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. समोर जो गोलंदाज येईल त्याच्यावर जोरदार प्रहार करत होता. अभिषेक शर्माने 35 चेंडूत झंझावाती शतक ठोकलं.  अभिषेक शर्माने या खेळीत 10 षटकार आणि 8 चौकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 294. 29 चा होता. अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करताना 15 चेंडूतच अर्धशतक साजरं केलं होतं. अभिषेक शर्माने या सामन्यातील पहिला चेंडू खेळताना उत्तुंग षटकार मारला. अभिषेक शर्माने डावची सुरूवातच षटकार मारून केल्याने पुढे काय होईल याचा अंदाज आला होता. अभिषेक शर्माने 6 षटकार, तर 4 चौकार मारले होते. अभिषेक शर्मा 38 चेंडूत 113 धावा करून बाद झाला.

अभिषेक शर्माच्या नावावर विक्रम

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये आयसीसीच्या पूर्ण सदस्या संघांमधील सामन्यांमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा ऐतिहासिक विक्रम अभिषेक शर्माच्या नावावर आहे.  त्याने 2026 मध्ये दिल्ली येथे अफगाणिस्तानविरुद्ध अवघ्या 30 चेंडूंत हे वादळी शतक झळकावले होते. या यादीत दुसऱ्या स्थानावर संयुक्तपणे झिम्बाब्वेचा सिंकदर रजा आणि न्यूझीलंडचा फिन एलन दुसऱ्या स्थानावर आहेत. या दोघांनी 33 चेंडूत शतक ठोकलं आहे.  या यादीत अभिषके शर्मा हा डेविड मिलर, रोहित शर्मा यांच्यासह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहे. या तिघांनी 35 चेंडूत शतक ठोकलं आहे. 

अभिषेक शर्माच्या नावावर शतकी विक्रम

पुरुष टी20 क्रिकेटमध्ये स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सामने मिळून सर्वाधिक शतके झळकावण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने टी20 क्रिकेटमध्ये तब्बल 22 शतके ठोकली आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा बाबर आझम (13 शतके) आणि तिसऱ्या स्थानावर भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा (11 शतके) आहे. त्याखालोखाल क्विंटन डी कॉक, विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर यांनी प्रत्येकी 10 शतके झळकावली आहेत.

दुसरीकडे, पुरुष आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटचा विचार केला तर सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम संयुक्तपणे ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल आणि भारताच्या रोहित शर्माच्या नावावर आहे. या दोघांनी प्रत्येकी 5 शतके झळकावली आहेत. त्याखालोखाल करणबीर सिंग, फिल सॉल्ट, सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये प्रत्येकी 4 शतके मारण्याचा पराक्रम केला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >