Tuesday, October 27, 2026

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचं नशिब फुटकं, विजय एक विकेट दूर असताना सामना हातून गेला

भारताचा अ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून तीन सामन्यांची औपचारिक कसोटी मालिका खेळत आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यावर भारताने पकड मिळवली होती. पण नशिबाने काही साथ दिली नाही.

भारत अ आणि न्यूझीलंड अ संघ यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना पार पडला आणि ड्रॉ झाला. खरं तर हा सामना भारत जिंकेल अशी स्थिती होती. पण नशिबाने काही साथ दिली नाही. त्यामुळे ड्रॉ वर समाधान मानावं लागलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर पहिल्या डावात न्यूझीलंडने सरशी घेतली होती. पण दुसऱ्या डावात भारताने सर्व हिशेब चुकता केला होता. पण शेवटच्या विकेटसाठी नशिबाने साथ दिली नाही. त्यामुळे भारताच्या हातून विजय निसटला. भारताने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 113 धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडने या धावांचा पाठलाग करताना सर्व गडी गमवून 317 धावा केल्या. तसेच पहिल्या डावात 204 धावांची मजबूत आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढण्याचं आव्हान भारतीय संघासमोर होतं.

दुसऱ्या डावात भारताचं कमबॅक

दुसऱ्या डावात भारताने जबरदस्त कामगिरी केली. भारताने दुसऱ्या डावात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना संधी दिली नाही. तसेच 516 धावा केल्या. म्हणजेच पहिल्या डावात न्यूझीलंडने घेतलेली 204 धावांची आघाडी मोडू काढली आणि विजयासाठी 312 धावांचं आव्हान दिलं. या डावात देवदत्त पडिक्कलने 199 धावांची खेळी केली. तसेच साई सुदर्शन 91, यश राठोड 66, वॉशिंग्टन सुंदर 52 अशा धावा केल्या. भारताने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची त्रेधातिरपीट उडाली. न्यूझीलंडने 187 धावांवर 9 गडी गमावल्या. एका बाजूने कर्टिस हिफी झुंज देत होता. पण त्याला इतर खेळाडूंची काही साथ मिळाली नाही. त्यामुळे एक विकेट फक्त भारताला विजयासाठी हवी होती. पण खराब प्रकाशमानामुळे सामन्याच्या शेवटी षटकं होऊ शकली नाही. पंचांनी खराब प्रकाशमानाचा दाखला देत सामना थांबवला. शेवटचा दिवस असल्याने सामान्याचा निकाल ड्रॉ म्हणून लागला.

दोन्ही संघाचे खेळाडू

न्यूझीलंड अ प्लेइंग 11: राइस मारिउ (कर्णधार), कर्टिस हीफी, टिम रॉबिन्सन, मॅथ्यू बॉयल, डीन फॉक्सक्रॉफ्ट, मिचेल हे (यष्टीरक्षक), सायमन कीन, क्रिस्टियन क्लार्क, फ्रेझर शीट, जेडन लेनॉक्स, झॅक गिब्सन. भारत अ प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (कर्णधार/विकेटकीपर), यश राठोड, वॉशिंग्टन सुंदर, अंशुल कंबोज, औकिब नबी, आकाश दीप, मुकेश चौधरी.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >