Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक कठोर न करता त्यांना शासकीय मदत मिळवून द्यावी, अशी सूचना मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना केली.

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक कठोर न करता, जास्तीत जास्त नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून त्यांना शासकीय मदत मिळवून द्यावी, अशी सूचना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना केली. मच्छीमारांच्या उपजीविकेवर दुष्काळाचा गंभीर परिणाम झाला असून, त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन मदत करणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.



दुष्काळामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांना मदत देण्यासंदर्भात शासनाला सादर करावयाच्या अहवालाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत नुकसानग्रस्त मच्छीमारांचे पंचनामे आणि मदतीच्या प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली. मदतीसाठी अनावश्यक निकष न लावता, जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय मदत पोहोचविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश राणे यांनी दिले. या बैठकीला मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.






दिघीमध्ये ऑफशोअर फॅब्रिकेशन यार्ड


दरम्यान, रायगड जिल्ह्यातील दिघी येथे ईपीसी आणि ऑफशोअर फॅब्रिकेशन यार्ड विकसित करण्याच्या प्रस्तावाबाबतही मंत्री नितेश राणे यांच्या दालनात बैठक झाली. मे. चौगुले कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या या बैठकीत प्रस्तावित प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पाच्या माध्यमातून सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. बैठकीला महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप आणि चौगुले कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.


Comments
Add Comment

मुंबईत पाणीकपात असताना रस्ते पाण्याने धुवायचे कसे? टँकरच्या पाण्याने रस्ते धुण्याचा प्रस्तावाला BMC चा विरोध

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत सध्या पाणीकपात कायम असताना आणि भविष्यातील पाण्याचे संकट असताना धुळीचे प्रदुषण

'सायबरटेक एशिया'चे पहिल्यांदाच भारतात आयोजन; जागतिक सायबर सुरक्षा परिषद कधी, कुठे असेल?

मुंबई: सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असलेल्या ‘सायबरटेक एशिया’चे

Nitesh Rane News: मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यात आदित्य ठाकरेंची चौकशी करा, शिवसेनेची मागणी

मुंबई: मिठी नदी गाळ उपशात झालेल्या ६५ कोटींच्या घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरिया याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक

विरोधकांच्या नॅरेटिव्हला उत्तर देण्यासाठी भाजपची फौज मैदानात

मंत्री नितेश राणे, आशिष शेलार, पडळकरांसह महत्त्वाच्या नेत्यांवर जबाबदारी मुंबई : विधानसभा आणि लोकसभा

Mango Haapus News: हापूससह आंब्याच्या प्रमुख जातींची ई-पीक पाहणीत स्वतंत्र नोंद होणार, कुठे करायची नोंदणी?

मुंबई: कोकणाची ओळख असलेल्या हापूस आंब्यासह महाराष्ट्रातील प्रमुख आंबा जातींची ई-पीक पाहणीमध्ये स्वतंत्रपणे

Dhaktya Sunbai Serial: मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’ मालिकेचा शुभारंभ, कधी अन् कुठं पहायला मिळणार?

मुंबई: गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुरू होणारी प्रत्येक नवी सुरुवात खास असते. याच भावनेतून झी मराठीने आपल्या