Jalgaon : जळगाव हादरले ! लेकीच्या साखरपुड्यापूर्वीच काळाचा घाला, शेतात विजेचा धक्का लागून पती-पत्नीचा मृत्यू

अशोक पाटील यांच्या मुलीचा साखरपुडा येत्या १ नोव्हेंबर रोजी होणार होता. ज्या आई-वडिलांच्या डोळ्यांत मुलीच्या सुखी संसाराची स्वप्ने होती, त्याच घरावर नियतीने घाला घातला. घरातील आनंदाचे रूपांतर क्षणात दुःखात झाले.

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील सुसरी गावाच्या शिवारात दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात काम करत असताना विद्युत तारेला स्पर्श झाल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला. अशोक बाबूराव पाटील (वय ५५) आणि सरीता अशोक पाटील (वय ४३) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या मुलीचा साखरपुडा येत्या १ नोव्हेंबर रोजी होणार होता. घरात साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



शेतात काम करताना काळाचा घाला


मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पाटील आणि सरीता पाटील हे मजुरांसह सुसरी गावाच्या शिवारातील गट क्रमांक १२८/१ मधील स्वतःच्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. शेतात कांद्याची लागवड करण्यात आली होती. याठिकाणी निंदणी आणि खुरपणीचे काम सुरू असताना विद्युत खांबावरील एक तार तुटून गवतात पडली होती.काम करत असताना या तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श अशोक पाटील यांना झाला. त्यामुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. पतीला वाचविण्यासाठी सरीता पाटील त्यांच्या जवळ गेल्या असता त्यांनाही विजेचा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे.



रुग्णालयात नेले; मात्र दोघांचाही मृत्यू


घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतात काम करणाऱ्या मजुरांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. दोघांनाही त्वरित वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



१ नोव्हेंबरला मुलीचा साखरपुडा


अशोक पाटील यांच्या मुलीचा साखरपुडा येत्या १ नोव्हेंबर रोजी होणार होता. ज्या आई-वडिलांच्या डोळ्यांत मुलीच्या सुखी संसाराची स्वप्ने होती, त्याच घरावर नियतीने घाला घातला. घरातील आनंदाचे रूपांतर क्षणात दुःखात झाले. या दुर्दैवी घटनेने शोककळा पसरली आहे. मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणासाठी तयारी सुरू असतानाच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. मृत दाम्पत्याच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा आणि आई असा परिवार आहे. कुटुंबातील दोन्ही प्रमुख व्यक्तींचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने नातेवाईकांसह ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.



वरणगाव पोलिसांकडून तपास सुरू


या घटनेची नोंद वरणगाव पोलिसांत करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुखराम सावकारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. शेतातील विद्युत तार नेमकी कोणत्या कारणामुळे तुटून खाली पडली, याचा शोध घेतला जात आहे.या दुर्दैवी घटनेमुळे सुसरी गावासह भुसावळ तालुक्यात शोककळा पसरली असून, ऐन साखरपुड्याच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Nashik Crime : नाशिकमध्ये पेट्रोल पंप चालकांना सायबर घोटाळ्याचा फटका ! QR कोडवर पैसे घेऊन रोख रक्कम उकळली अन् पुढे...

नाशिक : वैद्यकीय उपचार, कौटुंबिक अडचणी आणि प्रवासात पैसे संपल्याचे कारण सांगून पेट्रोल पंप चालकांकडून रोख रक्कम

IND vs NZ 3rd T20: विजयाचे श्रेय फलंदाजांना, पण गोलंदाजांना श्रेयस अय्यरने नेमकी काय दिली होती वॉर्निंग?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर भारताने

ChatGPT finds lost earbud : खडीत हरवलेला बारीक इअरबड अवघ्या ५ मिनिटांत ChatGPT ने शोधला! AI ची कमाल पाहून नेटकरी चकित

काही दिवसांपूर्वी उज्जैनच्या (Ujjain Temple) महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका भक्ताची हरवलेली चप्पल शोधून

Western Railway: पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय; मीरा रोड स्थानकावरील जिना बंद

पश्चिम रेल्वेने मीरा रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ ला जोडणाऱ्या दुसऱ्या उत्तर पादचारी पुलाचा

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी ! त्र्यंबकेश्वर नगरी फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजणार

त्र्यंबकेश्वर, नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची नांदी ठरणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये

Railway Travel Insurance: ऑनलाईननंतर आता रेल्वे आरक्षण काउंटरवरही प्रवास विम्याची सुविधा, केव्हापासून प्रवाशांना मिळणार लाभ?

मुंबई: अनेकदा रेल्वेतून प्रवास करताना अपघाताच्या घटना घडतात. रेल्वेवर दरड कोसळण्याची घटना, रेल्वेच्या