Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी ! त्र्यंबकेश्वर नगरी फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजणार

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये विविध स्तरांवर नियोजन सुरू आहे. सजावट, प्रकाशयोजना, गर्दीचे व्यवस्थापन आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसह तांत्रिक बाबींवर भर दिला जात आहे.

त्र्यंबकेश्वर, नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची नांदी ठरणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत आहे. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ परिसरात होणाऱ्या या सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून, शहरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि मोठ्या पडद्यांची व्यवस्था केली जात आहे.



कुशावर्त तीर्थावर मुख्य सोहळा; तयारीला वेग


सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन त्र्यंबकेश्वर नगरपालिका, त्र्यंबकेश्वर देवस्थान, संत निवृत्तिनाथ देवस्थान आणि कुंभमेळा प्राधिकरण यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे. सोहळ्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना कुशावर्त तीर्थ परिसरातील तयारीला वेग आला आहे. परिसरातील भाजीबाजार अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याने कार्यक्रमाच्या व्यवस्थेसाठी जागा उपलब्ध झाली आहे. कुशावर्त कुंड परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात येत आहे. या ठिकाणी भाषणे होणार नसल्याने स्वतंत्र मंच उभारण्यात येणार नाही. मात्र, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन गंगा गोदावरी मंदिर, सत्यनारायण मंदिर आणि त्यापुढील ठिकाणी मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहेत.



निमंत्रित आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्वतंत्र व्यवस्था


कार्यक्रमस्थळी गर्दीचे नियोजन करण्यासाठी कुशावर्त परिसरात इंग्रजी ‘यू’ आकाराची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये निमंत्रित, सुरक्षा पासधारक आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या पादत्राणांसाठीही स्वतंत्र व्यवस्था असेल. कार्यक्रमाच्या वेळी संपूर्ण कुशावर्त परिसरात एकसमान रंगछटांची आकर्षक प्रकाशयोजना केली जाणार आहे. यामुळे सोहळ्याला विशेष स्वरूप प्राप्त होणार आहे.



प्रमुख चौकांसह मंदिरांवर आकर्षक रोषणाई


ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. कुशावर्त, भगवती, तेली गल्ली, पाटील गल्ली आणि आंबेडकर चौकासह शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी फुलांची सजावट आणि आकर्षक स्वागत कमानी उभारल्या जाणार आहेत. शहरातील दोन ते तीन रस्ते एकत्र येणाऱ्या प्रमुख चौकांवर विशेष सजावट करण्याचे नियोजन आहे. याशिवाय शंकराचार्य मंदिर, त्र्यंबकेश्वर देवस्थान आणि परिसरातील अन्य मंदिरांवरही विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.



३० ऑक्टोबरला ग्रामफेरी; मार्गावर रांगोळ्या


ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून ३० ऑक्टोबर रोजी ग्रामफेरी काढण्यात येणार आहे. या फेरीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढल्या जाणार असून, ठिकठिकाणी नारळ आणि केळीचे खांब लावून परिसर सजविण्यात येणार आहे.मात्र, शहरात सध्या अस्वच्छता आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव ही चिंतेची बाब ठरत आहे. मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपाययोजनांकडेही लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.



सजावटीच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी


ध्वजारोहण सोहळ्याची सजावट टिकून राहावी, यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. कार्यक्रमस्थळी पानांचा वापर, केळीचे खांब आणि नारळाच्या फांद्या टाळण्यात आल्या आहेत. मोकाट कुत्रे, गायी आणि बकऱ्यांमुळे सजावटीचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर परिसरात त्रास देणाऱ्या २० हून अधिक माकडांना पकडण्यात आले आहे. यासोबतच मोकाट कुत्रे आणि अन्य जनावरांना पकडण्याची कार्यवाहीही सुरू आहे.



अपूर्ण कामे आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन


कुशावर्त परिसरात विविध विभागांची कामे सुरू असून, काही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. राष्ट्रपती ज्या परिसराला भेट देणार आहेत, त्या ठिकाणी अपूर्ण कामे दिसू नयेत यासाठी संबंधित भागात पडदे लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कुशावर्त परिसरातील अरुंद गल्ल्या, मर्यादित जागा आणि भौगोलिक रचना लक्षात घेता राष्ट्रपतींसह अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी नियोजित करण्यात आलेली व्हॅनिटी व्हॅनची व्यवस्था रद्द करण्यात आली आहे.



सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न


सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये विविध स्तरांवर नियोजन सुरू आहे. सजावट, प्रकाशयोजना, गर्दीचे व्यवस्थापन आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसह तांत्रिक बाबींवर भर दिला जात आहे. आता ३१ ऑक्टोबर रोजी हा सोहळा उत्साहात आणि सुरळीत पार पडावा, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

Comments
Add Comment

Nashik Kumbhmela : नाशिकमध्ये धार्मिक-सांस्कृतिक सोहळ्यांची पर्वणी ! 30 ऑक्टोबरला भव्य सांस्कृतिक शोभायात्रा, 31ऑक्टोबरला धर्मध्वजारोहण सोहळा

नाशिक : भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा, संतपरंपरा, अध्यात्म, लोककला आणि विविधतेतील एकात्मतेचे दर्शन घडविणाऱ्या

दुष्काळी मदतीतून लोकप्रतिनिधी, आयकरदाते आणि सरकारी कर्मचाऱ्यांना वगळणार - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

रायगड, कोल्हापूरमधील आणखी तालुकांचा दुष्काळी यादीत समावेश होणार

अभिषेक शर्माने मोडला ख्रिस गेलचा षटकारांचा विक्रम, नेमका काय रेकॉर्ड केला ते जाणून घ्या

[caption id="attachment_1069764" align="aligncenter" width="800"] अभिषेक शर्माने वेलिंग्टन टी20 क्रिकेटमध्ये 11 षटकार मारले. यासह टी20 आंतरराष्ट्रीय

Mumbai Nashik highway fire : मुंबई-नाशिक महामार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग; कापडाच्या गोण्यांमुळे आगीने घेतला उग्र अवतार

मुंबई-नाशिक (Mumbai-Nashik Expressway) महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी

Nashik Crime : नाशिकमध्ये पेट्रोल पंप चालकांना सायबर घोटाळ्याचा फटका ! QR कोडवर पैसे घेऊन रोख रक्कम उकळली अन् पुढे...

नाशिक : वैद्यकीय उपचार, कौटुंबिक अडचणी आणि प्रवासात पैसे संपल्याचे कारण सांगून पेट्रोल पंप चालकांकडून रोख रक्कम

IND vs NZ 3rd T20: विजयाचे श्रेय फलंदाजांना, पण गोलंदाजांना श्रेयस अय्यरने नेमकी काय दिली होती वॉर्निंग?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर भारताने