Nashik : नाशिकच्या सातपूरमध्ये भीषण अपघात ! मशिनमध्ये डोके अडकून 21 वर्षीय कामगाराचा मृत्यू

नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत काम करताना मशिनमध्ये डोके अडकून २१ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुमीत रामदास सपकाळे (वय २१) असे मृत कामगाराचे नाव असून, या घटनेमुळे सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमीत सपकाळे हा मूळचा पाडळसा, तालुका यावल, जिल्हा जळगाव येथील रहिवासी होता. तो सध्या नाशिकमधील सिडको परिसरात उत्तमनगर येथे केएसडब्ल्यू कॉलेजसमोर राहत होता.



कामादरम्यान अचानक घडली दुर्घटना


सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीत हा सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कंपनीत कामावर गेला होता. कंपनीतील प्लांट क्रमांक २ मध्ये तो काम करत असताना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक त्याचे डोके मशिनमध्ये अडकले. या दुर्घटनेत सुमीत गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती गंभीर बनली.



सातपूर परिसरात हळहळ


अपघाताची माहिती मिळताच कंपनीतील प्रसाद शुक्ल यांनी सुमीतला तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय तपासणीनंतर डॉ. पाटील यांनी त्याला मृत घोषित केले. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी कामगाराचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कामगार वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे कंपनीतील कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

Comments
Add Comment

Conservation Reserve : नाशिकच्या दिंडोरी, सुरगाणा आणि ताहाराबादमध्ये नवीन संवर्धन राखीव क्षेत्रे, राज्यातील 14 प्रस्तावांना मंजुरी

Nashik : महाराष्ट्रातील वन्यजीव आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पुणे,

Farmer loan recovery Maharashtra : शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली केल्यास वित्तीय संस्थांवर कठोर कारवाई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणार नाही मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून वित्तीय संस्था आणि

Music Concert Safety Tips : म्युझिक कॉन्सर्टला जाताय ? तुमचा अनुभव सुरक्षित आणि खास बनवण्यासाठी लक्षात ठेवा या ५ महत्त्वाच्या गोष्टी!

संगीत मैफिलीचा (Music Concert) आनंद घेणे हा एक उत्तम अनुभव असतो; मात्र गर्दी आणि घाईगडबडीत लहान-सहान चुकांमुळे तुमचा मूड

अभिषेक शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना फोडला घाम, 35 चेंडूत ठोकलं झंझावती शतक

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्मा नावाचं वादळ घोंघावलं. न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठई

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लावणी कलाकारांकडून एक लाख रुपयांचा निधी सुपूर्द

राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये योगदान देण्याच्या उद्देशाने

विजय-रश्मिकाच्या नात्याबाबत खोट्या पोस्टचा सुळसुळाट? मॅनेजरची पोलिसांत तक्रार

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या एका शोमधील व्हिडिओज वायरल होत आहेत.