Nashik Kumbh Mela : 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण आणि गोदा आरतीसाठी नाशिक पोलिसांचा मूव्हमेंट प्लॅन जाहीर ! बंद राहणारे रस्ते आणि पार्किंगची ठिकाणे जाणून घ्या
October 27, 2026 12:50 PM
1/12 नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ च्या ३१ ऑक्टोबर २०२६, शनिवार रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने मूव्हमेंट प्लॅन जाहीर केला आहे. सकाळी ध्वजारोहण आणि सायंकाळी गोदा आरती या दोन्ही कार्यक्रमांसाठी भाविकांची ये-जा, आरती करणाऱ्या ट्रूपचा मार्ग, नागरिकांसाठी बंद राहणारे रस्ते आणि पार्किंगची ठिकाणे या प्लॅनमध्ये निश्चित करण्यात आली आहेत.
2/12 सकाळच्या ध्वजारोहणासाठी गांधी तलाव यशवंत महाराज पटांगण येथे येणाऱ्या भाविकांसाठी पाच पार्किंग मार्ग दिले आहेत. गंगापूर रोड, गुरांचा दवाखाना, सिद्धेश्वर मंदिर मार्गे संभाजी महाराज गार्डन येथे वाहने पार्क करून अहिल्यादेवी होळकर पुलाखालून एकमुखी दत्त घाट मार्गे गांधी तलाव गाठता येईल. अशोक स्तंभ, रविवार कारंजा येथे पार्किंग करून सराफ बाजार, सरकारवाडा पोलीस चौकी, भांडी बाजार, बालाजी मंदिर, निळकंठेश्वर घाट मार्गे गांधी तलावाकडे जाता येईल. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पार्किंगहून रेडक्रॉस सिग्नल, धुमाळ टी पॉइंट, नेहरू चौक, दिल्ली दरवाजा मार्गे रोकडोबा मैदानाकडे जाण्याचा मार्ग निश्चित केला आहे.
3/12 नकाशा
4/12 अशोक स्तंभ राठी शाळा पार्किंगहून सिद्धेश्वर मंदिर, संभाजी महाराज गार्डन मार्गे गांधी तलावाकडे आणि बी. डी. भालेकर मैदान पार्किंगहून रेडक्रॉस सिग्नल, धुमाळ टी पॉइंट, नेहरू चौक, दिल्ली दरवाजा मार्गे रोकडोबा मैदानाकडे जाण्याचा मार्ग निश्चित केला आहे.
5/12 नकाशा
6/12 जुने भाजी पटांगण आणि म्हसोबा पटांगण येथे येणाऱ्या भाविकांसाठीही सकाळी तीन वाहन मार्ग आहेत. तपोवन क्रॉसिंग, मुंबई-आग्रा महामार्ग ब्रिजखालून स्वामी नारायण मंदिर, अमरधाम मार्गे शिंदे मळा येथे पार्किंग करून गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण मार्गे जुने भाजी पटांगण गाठता येईल. मुंबई-आग्रा महामार्गाने ट्रॅक्टर हाऊस, नानावली पोलीस चौकी, अमरधाम ब्रिज क्रॉस करून शिंदे मळा पार्किंग, तर गणेशवाडी देवी चौक, फुलबाजार मार्गे गौरी पटांगण पार्किंग करून जुने भाजी पटांगणाकडे जाता येईल.
7/12 सायंकाळच्या गोदा आरतीसाठीचा नकाशा - नागरिकांना प्रवेश नसलेले मार्ग लाल रंगात दर्शवण्यात आले आहेत.
8/12 सायंकाळी नागरिकांसाठी बंद राहणारे प्रमुख रस्ते: एकमुखी दत्त मंदिर - गांधी तलाव - य. मा. पटांगण - कपुरथळा मैदान - रोकडोबा मैदान घाट (सामान्य नागरिकांसाठी बंद) गुरांचा दवाखाना - घरपुरे घाट - सिद्धेश्वर मंदिर - फनीबाबा दर्गाह - डांगर उतार - एकमुखी दत्त मंदिर अशोक स्तंभ - रविवार कारंजा - मंगेश मिठाई - सराफ बाजार - भांडी बाजार - बालाजी मंदिर धुमाळ पॉइंट - प्रकाश सुपारी - नेहरू चौक - दिल्ली दरवाजा रविवार कारंजा - मेन रोड - धुमाळ पॉइंट राम सेतू पूल आणि गाडगे महाराज पूल
9/12 हे रस्ते नागरिकांसाठी बंद राहतील - रविवार कारंजा – होळकर ब्रिज – मालेगाव स्टँड – पंचवटी कारंजा – दिंडोरी नाका ; मखमलाबाद नाका – मालेगाव स्टँड – रामकुंड – सरदार चौक ; रामकुंड – मालवीय चौक – पंचवटी कारंजा ; शनी चौक – रामकुंड ; गाडगे महाराज पूल आणि राम सेतू पूल
10/12 पार्किंगची ठिकाणे : मालेगाव स्टँड ते मखमलाबाद नाका पार्किंग, वल्लभ पीठ पार्किंग, संभाजी महाराज गार्डन पार्किंग, रविवार कारंजा पार्किंग, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पार्किंग, रुंगठा शाळा पार्किंग, बी. डी. भालेकर मैदान पार्किंग, शिंदे मळा पार्किंग, श्रद्धा लॉन्स पार्किंग आणि के. टी. एच. एम. कॉलेज पार्किंग.
11/12 पार्किंगची ठिकाणे
12/12 पार्किंगची ठिकाणे
भाविकांनी वाहने ठरवून दिलेल्या पार्किंगमध्येच लावावीत आणि पायी चालण्याच्या मार्गाचेच पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नकाशात लाल रंगाने दाखवलेले रस्ते नागरिकांसाठी बंद राहतील.