Nashik Kumbhmela : नाशिकमध्ये धार्मिक-सांस्कृतिक सोहळ्यांची पर्वणी ! 30 ऑक्टोबरला भव्य सांस्कृतिक शोभायात्रा, 31ऑक्टोबरला धर्मध्वजारोहण सोहळा

या दोन दिवसीय कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन, सामाजिक समता, पर्यावरण संवर्धन आणि मानवतेचा संदेश व्यापक समाजापर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे.

नाशिक : भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा, संतपरंपरा, अध्यात्म, लोककला आणि विविधतेतील एकात्मतेचे दर्शन घडविणाऱ्या भव्य सांस्कृतिक शोभायात्रेचे आयोजन शुक्रवार ३० ऑक्टोबर २०२६ रोजी नाशिक येथे करण्यात आले आहे. त्यानंतर शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी पवित्र रामतीर्थ येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भव्य धर्मध्वजारोहण सोहळा संपन्न होणार आहे.


श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ, नाशिक यांच्या वतीने या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक धर्मध्वजारोहण सोहळ्यास भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी आणि पूज्यपाद जगद्गुरु श्रीमद् रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीचे नियोजन आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने वैष्णव आखाड्यांचे प्रमुख श्रीमंत तसेच हजारो संत-महंत, धर्माचार्य, विविध धार्मिक व सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी, रामानंद संप्रदायाचे अनुयायी आणि देशभरातून भाविक दाखल होण्याची अपेक्षा आहे.



विविध कलापथकांच्या सहभागातून सांस्कृतिक शोभायात्रा


शुक्रवारी, ३० ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये भव्य सांस्कृतिक शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत रामानंद संप्रदायासह विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांची कलापथके सहभागी होणार आहेत. भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा, संतपरंपरा, अध्यात्म, विविध प्रांतांतील लोककला आणि विविधतेतील एकात्मतेचे दर्शन या माध्यमातून घडविण्यात येणार आहे. शोभायात्रेचा प्रारंभ मोदी ग्राउंड, नाशिक येथून होणार असून, विविध मार्गांवरून मार्गक्रमण केल्यानंतर पवित्र रामकुंड येथे गंगा-गोदावरी आरतीने तिचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीतील परंपरा, सामाजिक समरसता आणि सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे.



रामतीर्थ येथे धर्मध्वजारोहणाचा धार्मिक सोहळा


शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी पवित्र रामतीर्थ (रामकुंड), पंचवटी येथे धर्मध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या कार्यक्रमाला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पूज्यपाद जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच विविध आखाड्यांतील संत-महंत, धर्माचार्य, धार्मिक व सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी, रामानंद संप्रदायाचे अनुयायी आणि देशभरातील भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. सनातन धर्मपरंपरेत धर्मध्वज हा अध्यात्म, त्याग, तपश्चर्या, सदाचार आणि धार्मिक-सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक मानला जातो. पवित्र गोदावरीच्या तीरावर होणाऱ्या या सोहळ्याच्या माध्यमातून संतपरंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यासह राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता आणि मानवकल्याणाचा संदेश देण्यात येणार आहे.



संस्कृतीचे जतन आणि सामाजिक समरसतेचा संदेश


या दोन दिवसीय कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन, सामाजिक समता, पर्यावरण संवर्धन आणि मानवतेचा संदेश व्यापक समाजापर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या सहभागामुळे या कार्यक्रमांना व्यापक स्वरूप प्राप्त होणार आहे. श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ, नाशिक यांच्या वतीने या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित संस्था, भाविक आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



कार्यक्रमांचा तपशील


भव्य सांस्कृतिक शोभायात्रा


- दिनांक : शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६


- वेळ : दुपारी २ वाजता


- प्रारंभस्थळ : मोदी ग्राउंड, नाशिक


- समारोप : रामकुंड येथे गंगा-गोदावरी आरती



धर्मध्वजारोहण सोहळा


- दिनांक : शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६


- वेळ : दुपारी १२ वाजून २ मिनिटे


- स्थळ : रामतीर्थ (रामकुंड), पंचवटी, नाशिक


- प्रमुख उपस्थिती : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पूज्यपाद जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य महाराज


- आयोजक : श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ, नाशिक

Comments
Add Comment

दिव्यांगांसाठी जिल्हा नियोजन निधीतील एक टक्का राखीव; जलसंपदा विभागात 39 हजार 722 पदांचा आकृतीबंध

मुंबई : दिव्यांगांचे पुनर्वसन व सक्षमीकरण, जलसंपदा विभागाची प्रशासकीय पुनर्रचना, औद्योगिक विकास आणि ग्रामीण

Pratap Sarnaik: ओला, उबेर, रॅपिडोसाठी परिवहन मंत्र्यांचे कडक नियमावली, नियम मोडलात तर थेट जेल; वाचा सविस्तर

मुंबई: रॅपिडो, ओला, उबर यांसारख्या ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांच्या चालकांविरोधात विविध प्रकारच्या तक्रारी

दुष्काळी भागांत मत्स्यबीजासाठी ‘डीपीडीसी’मधून निधी; मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : दुष्काळग्रस्त भागांतील मत्स्य व्यवसायाला उभारी देण्यासाठी मत्स्यबीज उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हा

Navi Mumbai Airport: चिपी- नवी मुंबई विमानसेवेला 100 टक्के व्यवहार्यता तफावत निधी, पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी हवाई प्रवासाचा मार्ग मोकळा करण्याच्या दृष्टीने

नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून

MP Sunil Tatkare News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, खासदार सुनिल तटकरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच राज्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचं