अभिषेक शर्माने मोडला ख्रिस गेलचा षटकारांचा विक्रम, नेमका काय रेकॉर्ड केला ते जाणून घ्या
अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात झंझावाती शतक ठोकलं. या खेळीसह भारताने सामना आणि मालिका दोन्ही जिंकलं. इतकंच एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला.
October 27, 2026 05:59 PM
1/5 अभिषेक शर्माने वेलिंग्टन टी20 क्रिकेटमध्ये 11 षटकार मारले. यासह टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात तीन वेळा दहाहून अधिक षटकार मारण्याचा विक्रम केला. या कामगिरीसह अभिषेक शर्माने ख्रिस गेलचा विक्रम मोडला. ख्रिस गेलने अशी कामगिरी दोन वेळा केली होती. (Photo: BCCI Twitter)
2/5 अभिषेक शर्माने कमी चेंडूत शतक ठोकून आणखी एक कारनामा केला आहे. तीनवेळा 37पेक्षा कमी चेंडूत टी20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 30 चेंडूत, न्यूझीलंडविरुद्ध 35 चेंडूत आणि इंग्लंडविरुद्ध 37 चेंडूत शतक ठोकलं आहे. (Photo: BCCI Twitter)
3/5 अभिषेक शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20हून कमी चेंडूत 50 धावा करण्याची ही नववी वेळ ठरली. यापूर्वी अशी कामगिरी कोणीही करू शकलेलं नाही. युवराज, वॉर्नर, मुनरो, फिन एलन यांनी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. (Photo: BCCI Twitter)
4/5 अभिषेक शर्माने टी20 क्रिकेटच्या 216 डावात 11वं शतक ठोकलं आहे. यासह त्याने टी20 10 शतकं ठोकणाऱ्या विराट कोहलीला मागे टाकलं आहे. विराट कोहलीने 413 डावात 10 टी20 शतक ठोकलं आहे. (Photo: BCCI Twitter)
5/5 अभिषेक शर्माने वैभव सूर्यवंशीसोबत 18.55च्या रनरेटने 100हून अधिक धावांची भागीदारी केली. यासह मोईन अली आणि बेयरस्टोचा विक्रम मोडीत काढला आहे. त्यांनी 2022 मध्ये 18.17 च्या रनरेटने 100हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. (Photo: BCCI Twitter)