
बिग बॉसच्या सीजन 20 मध्ये रोज नवनवीन घडामोडी घडत असतात. टास्कदरम्यान होणारी भांडणं, मैत्री यामुळे हा सीजन अधिक रंजक बनत आहे. पुढील एपिसोडमध्ये काय होणार याची प्रतीक्षा चाहते करत असतात. नवीन एपिसोडमध्ये अरिशफा खानचा गुल्लूसोबत जोरदार वाद होतो, तर आम्रपाली दुबे आणि माही यांच्यातही जोरदार भांडण होते. दरम्यान, नॉमिनेशन टास्कमध्ये माहीला पाच स्पर्धकांना नॉमिनेट करण्याचा विशेष अधिकार मिळतो. त्याचवेळी स्काउट हा लव्ह गिलला नॉमिनेट करतो. यामुळे घरात एक नवा ड्रामा तयार होतो ज्यामुळे लव्ह भावूक झालेली पाहायला मिळते.
माही आणि आम्रपलीचे किचनमध्ये वाजलं
स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना आम्रपाली आणि माही यांच्या जोरदार वाद झाला. माही वारंवार आम्रपालीला डाळ शिजवायला सांगते, ज्यामुळे आम्रपालीला राग येतो. माहीने सांगितलेले प्रत्येक काम करायला मी काही तिची मोलकरीण नाही असे आम्रपाली म्हणाली. यावर माहीने उत्तर दिले की, 'मी जर आठवण करून दिली नाही तर जेवण उशिरा शिजेल.' परिस्थिति इतकी चिघळते की त्या दोघी एकमेकींच्या स्वयंपाकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागतात. गुल्लू आणि कनिका सुद्धा आम्रपालीला पाठिंबा देताना दिसतात.
http://prahaar.in/2026/10/28/sassoon-dock-to-be-transformed-into-a-model-dock-for-the-country-minister-nitesh-rane-safety-kits-distributed-to-fisherwomen-who-peel-prawns/गुल्लू आणि अरिशफा यांच्यात वाद
गुल्लू अरिशफा खानला कमी शिकलेली मुलगी म्हणतो, त्यामुळे तिला राग येतो. ती सांगते की कुटुंबाला मदत करण्यासाठी तिने लहान वयातच काम करायला सुरुवात केली. त्यामुळेच ती तिचे शिक्षण पूर्ण करू शकली नाही. गुल्लू आपल्या मतावर ठाम राहतो. दरम्यान, माहीसुद्धा अरिशफाला पाठिंबा देते. यानंतर गुल्लू आणि अरिशफा यांच्यातील वाद विकोपाला जातो.
दरम्यान, या एपिसोडमध्ये नॉमिनेशनसाठी लुडोसारखा एक टास्क आहे. बिग बॉस माहीला एक शक्ति देतो, ज्यामुळे ती आम्रपाली दुबे, मनीष गोयल, कनिका मन, अरिशफा खान आणि लव्ह गिल यांना नॉमिनेट करू शकते. यानंतर क्रमांकाचे चाक वापरुन एक कार्य सुरू होते ज्यात घरातील सदस्यांना लाल आणि हिरव्या खुर्च्यांवर बसलेल्या स्पर्धकांमध्ये जागांची अदलाबदल करावी लागते. या कार्यात घरातील सदस्यांच्या सुरक्षित आणि असुरक्षित जागा आलटून पालटून येतात, ज्यामुळे खेळ अधिक मनोरंजक बनतो. या टास्कदरम्यान, स्काउट लव्ह गिलला नॉमिनेट करतो. त्याच्या या निर्णयामुळे लव्ह गिलला वाईट वाटते. दरम्यान, घरातील नॉमिनेशनवरुण निर्माण झालेला तणाव वाढतच जातो.




