अभिषेक शर्मा पुन्हा एकदा नंबर 1 टी20 खेळाडू, वादळी शतकामुळे मिळाला फायदा

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने झंझावाती शतक ठोकलं. या शतकी खेळीसह अभिषेक शर्माला जबरदस्त फायदा झाला आहे. टी20 क्रमवारीत अभिषेक शर्माने पहिलं स्थान गाठलं आहे.

1/5 वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अभिषेक शर्माने शतक झळकावल्यानंतर आयसीसी पुरुष टी20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत त्याला फायदा झाला. अभिषेक शर्मा पुन्हा एकदा अव्वल स्थानी पोहोचला आहे. (Photo: ANI)

2/5 भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा आयसीसी टी20 फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेकने 38 चेंडूंमध्ये केलेल्या 113 धावांच्या खेळीमुळे दुसऱ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. (Photo: ANI)

3/5 अभिषेक शर्माच्या खेळीने क्रमवारीच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली. अभिषेक शर्माने आपला सहकारी इशान किशनला मागे टाकले. अभिषेक शर्माने जुलैमध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर अव्वल स्थानी पोहोचला होता. इशान आता तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. (Photo: ANI)

4/5 पहिल्या स्थानावर असलेला इशान किशन दोन स्थानांनी घसरला आहे. दुखापतीमुळे इशान न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टी20 सामने खेळू शकला नाही. तो आता 866 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Photo: ANI)

5/5 अभिषेक शर्माने जुलै 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडला मागे टाकत पहिल्यांदा अव्वल स्थान पटकावले होते. त्याने हे स्थान जवळपास एक वर्ष टिकवून ठेवले होते, परंतु या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या टी20 विश्वचषकात इशान किशनच्या सातत्यपूर्ण कामगिरीने अव्वल स्थानी पोहोचला. (Photo: ANI)

 
Comments
Add Comment

दुखापतीवर मात करून यस्तिका भाटियाचं दमदार पुनरागमन; WBBL मध्ये नवी संधी, कोणत्या संघाकडून खेळणार?

नवी दिल्ली: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार यष्टीरक्षक-फलंदाज यस्तिका भाटिया हिच्याबाबत एक मोठी बातमी समोर

4 वर्षांचा वनवास संपला! टीम इंडियात कमबॅक करताच भुवनेश्वर कुमारने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

वेलिंग्टन: भारतीय क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर

IND vs NZ: भारताकडे सलामीवीरांचे पर्यायच पर्याय! अभिषेक, सॅमसन, ईशान की वैभव सूर्यवंशी?

India’s Opening Conundrum: भारतीय टी-20 क्रिकेटमध्ये सलामीच्या जोडीसाठी आता एका ठरावीक पर्यायावर अवलंबून राहण्याची गरज उरलेली

WPL 2027 Auction Live: वुमन्स प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वासाठी लागणार बोली, सर्व अपडेट एका क्लिकवर

वुमन्स प्रीमियर लीगच्या आतापर्यंत झालेल्या चार पर्वात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रेंचायझी

INDW vs ZIMW 3rd ODI: झिम्बाब्वेने तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला, भारताच्या वाटेला प्रथम गोलंदाजी

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा वनडे सामना वडोदऱ्याच्या कोटम्बी स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात

WPL 2027 Auction: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी खेळाडूंवर आज लागणार बोली! फ्रेंचायझींकडे किती पैसे? जाणून घ्या

वुमन्स प्रीमियर लीग 2027 स्पर्धेसाठी केरळच्या कोच्चीमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलाव प्रक्रियेसाठी