WPL 2027 Auction Live: वुमन्स प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वासाठी लागणार बोली, सर्व अपडेट एका क्लिकवर

WPL 2027 Auction Live Update: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या पाचव्या हंगामापूर्वी स्पर्धेतील 27 जागांसाठी बोली लागणार आहे. एकूण 150 खेळाडू या लिलाव प्रक्रियेत आहे. यात 122 भारतीय, तर 28 विदेशी खेळाडू आहे. 2026 पर्वापूर्वी झालेल्या मेगा लिलावादरम्यान प्रत्येक संघात मोठे फेरबदल करण्यात आले होते. आता संघ त्या उणिवा भरून काढण्याचा प्रयत्न करतील.

वुमन्स प्रीमियर लीगच्या आतापर्यंत झालेल्या चार पर्वात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रेंचायझी यशस्वी ठरल्या आहेत. या दोन्ही फ्रेंचायझींनी प्रत्येकी दोन जेतेपद मिळवले आहेत. तर युपी वॉरियर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि गुजराज जायंट्स या फ्रेंचायझींच्या पदरी निराशा पडली आहे. यूपी वॉरियर्ससाठी 2026 चा हंगाम खूपच वाईट गेला. त्यामुळे फ्रेंचायझीने आपल्या संघातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. श्वेता सेहरावत, किरण नवगिरे आणि डिएन्ड्रा डॉटिन यांसारख्या मोठ्या खेळाडूंना संघाने करारमुक्त केले आहे. आता पर्समध्ये 3 कोटीहून अधिकची रक्कम असून मोठी बोली लावण्याची संधी आहे.
Live Updates

WPL 2027 चा लिलाव कुठे होत आहे?

वुमन्स प्रीमियर लीग 2027चा लिलाव कोची येथील ग्रँड हयातमध्ये आयोजित केला जाईल.

लिलावात उपलब्ध असलेले सर्वात मोठे खेळाडू कोण?

खेळाडूंच्या यादीतील सर्वात प्रतिष्ठित खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाची कर्णधार सोफी मोलिनॉक्स, जेस जोनासेन आणि ग्रेस हॅरिस यांचा समावेश आहे. चमारी अथापथ्थू आणि क्लोई ट्रायॉन या इतर विदेशी खेळाडूही मागणीत असण्याची शक्यता आहे.

WPL 2027 लिलावापूर्वी प्रत्येक संघात किती जागा उपलब्ध आहेत?

मुंबई इंडियन्स - 6 (0 विदेशी)

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर - 5 (2 विदेशी)

दिल्ली कॅपिटल्स - 5 (1 विदेशी)

यूपी वॉरियर्स - 8 (3 विदेशी)

गुजरात जायंट्स - 3 (1 विदेशी)

WPL 2027 लिलावापूर्वी प्रत्येक संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे?

मुंबई इंडियन्स - 90 लाख

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - 1.15 कोटी

दिल्ली कॅपिटल्स - 1.10 कोटी

यूपी वॉरियर्स - 3.75 कोटी

गुजरात जायंट्स - 1.25 कोटी

Comments
Add Comment

IND vs NZ: भारताकडे सलामीवीरांचे पर्यायच पर्याय! अभिषेक, सॅमसन, ईशान की वैभव सूर्यवंशी?

India’s Opening Conundrum: भारतीय टी-20 क्रिकेटमध्ये सलामीच्या जोडीसाठी आता एका ठरावीक पर्यायावर अवलंबून राहण्याची गरज उरलेली

INDW vs ZIMW 3rd ODI: झिम्बाब्वेने तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला, भारताच्या वाटेला प्रथम गोलंदाजी

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा वनडे सामना वडोदऱ्याच्या कोटम्बी स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात

WPL 2027 Auction: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी खेळाडूंवर आज लागणार बोली! फ्रेंचायझींकडे किती पैसे? जाणून घ्या

वुमन्स प्रीमियर लीग 2027 स्पर्धेसाठी केरळच्या कोच्चीमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलाव प्रक्रियेसाठी

Neeraj Yadav : तीन सुवर्णपदके जिंकणारे आशियाई पॅरा खेळाडू नीरज यादव यांनी जीवन संपवले; भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा

भारताविरुद्धचा तिसरा टी20 सामना कुठे गमावला? न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की...

न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि

12 चेंडूत अर्धशतक ठोकण्यात अपयशी..! युवराज सिंगने टोमणा मारला, अभिषेक शर्मा दिली मजेशीर प्रतिक्रिया

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात अभिषेक शर्माने 35 चेंडूत शतक ठोकलं. त्याच्या आक्रमक खेळीमुळे भारताचा