4 वर्षांचा वनवास संपला! टीम इंडियात कमबॅक करताच भुवनेश्वर कुमारने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

जवळपास 4 वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने नुकतेच एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. टीम इंडियात कमबॅक हे त्याचे अंतिम ध्येय नव्हते, तर भविष्यात देशांतर्गत क्रिकेट खेळण्यावर त्याचे पूर्ण लक्ष असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

वेलिंग्टन: भारतीय क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार जवळपास 4 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेन्यानंतर पुन्हा एकदा भारतीय टी-20 संघात परतला आहे. नोव्हेंबर 2022 नंतर त्याने राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. परंतु, संघात पुनरागमन केल्यावर या 36 वर्षीय गोलंदाजाने जे म्हटले आहे, ते ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत. भुवनेश्वरने स्पष्ट केले की, भारतीय संघात परतण्यासाठी तो कधीही क्रिकेट खेळला नाही. त्याचे लक्ष नेहमीच आगामी स्पर्धा आणि आव्हानांवर केंद्रित राहिले आहे.


न्यूझीलंडविरुद्धच्या 3 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर भुवनेश्वरने माध्यमांशी बोलताना सांगितले की, भारतासाठी खेळणे ही प्रत्येक खेळाडूसाठी अभिमानाची बाब आहे, पण ते साध्य करण्यासाठी त्याने कोणतेही विशिष्ट किंवा मोठे ध्येय ठेवले नव्हते. तो म्हणाला, "खरं सांगायचं तर, भारतीय संघात परत येण्यासाठी मी कोणतीही घाई केली नाही. हो, हे नक्कीच एक स्वप्न आहे आणि मी आनंदी नाही असं मी अजिबात म्हणत नाही. देशाचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट आहे." गेल्या काही वर्षांत त्याच्या फिटनेसवर आणि कामगिरीवर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. यावर बोलताना तो पुढे म्हणाला, "गेल्या 4 वर्षांत, क्रिकेट आणि फिटनेस या दोन्ही बाबतीत माझ्यासमोर आलेल्या सर्व आव्हानांना आणि कठीण प्रसंगांना मी धैर्याने सामोरे गेलो आहे. केवळ भारतीय संघात परत मिळवण्यासाठीच मला क्रिकेट खेळावे लागेल, असा विचार मी माझ्या आयुष्यात कधीही केला नाही."



भुवनेश्वर आपल्या भविष्यासाठी फार दूरचा विचार करत नाहीये. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर आता त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळायचे आहे. त्याने आगामी विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे युवा खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळणार यात शंका नाही. विशेष म्हणजे, मागील आयपीएल 2025 मध्ये 17 बळी आणि 2026 च्या हंगामात तब्बल 28 बळी घेणारा भुवनेश्वर हा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संघाच्या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला होता. त्याच्या याच भेदक आणि प्रभावी कामगिरीमुळे आरसीबीला सलग 2 विजेतेपदे जिंकणे शक्य झाले आणि भारतीय संघात त्याच्या पुनरागमनाचा मजबूत पाया रचला गेला. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो कशी कामगिरी करतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

IND vs NZ: भारताकडे सलामीवीरांचे पर्यायच पर्याय! अभिषेक, सॅमसन, ईशान की वैभव सूर्यवंशी?

India’s Opening Conundrum: भारतीय टी-20 क्रिकेटमध्ये सलामीच्या जोडीसाठी आता एका ठरावीक पर्यायावर अवलंबून राहण्याची गरज उरलेली

WPL 2027 Auction Live: वुमन्स प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वासाठी लागणार बोली, सर्व अपडेट एका क्लिकवर

वुमन्स प्रीमियर लीगच्या आतापर्यंत झालेल्या चार पर्वात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रेंचायझी

INDW vs ZIMW 3rd ODI: झिम्बाब्वेने तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला, भारताच्या वाटेला प्रथम गोलंदाजी

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा वनडे सामना वडोदऱ्याच्या कोटम्बी स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात

WPL 2027 Auction: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी खेळाडूंवर आज लागणार बोली! फ्रेंचायझींकडे किती पैसे? जाणून घ्या

वुमन्स प्रीमियर लीग 2027 स्पर्धेसाठी केरळच्या कोच्चीमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलाव प्रक्रियेसाठी

Neeraj Yadav : तीन सुवर्णपदके जिंकणारे आशियाई पॅरा खेळाडू नीरज यादव यांनी जीवन संपवले; भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा

भारताविरुद्धचा तिसरा टी20 सामना कुठे गमावला? न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की...

न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि