Devendra Fadnavis: अंजनगाव सुर्जीमध्ये साकारणार संत रूपलालजी महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक; ₹80 कोटींच्या आराखड्याला मंजुरी

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे संत शिरोमणी रूपलालजी महाराज यांच्या भव्य राष्ट्रीय स्मारकासाठी ₹80.26 कोटींच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबई: अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे वारकरी संप्रदायाचा गौरव वाढवणारे संत शिरोमणी रूपलालजी महाराज यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ₹80.26 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील 'वर्षा' निवासस्थानी पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


या प्रकल्पामुळे वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती चळवळीचा वारसा आणि संत रूपलालजी महाराजांचे समाजप्रबोधनाचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचणार आहेत. मौजे जेठमलपूर येथे आकार घेणाऱ्या या स्मारकामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत.



विकास आराखड्यातील ठळक वैशिष्ट्ये:




  • पहिला व दुसरा टप्पा: भाविक, वारकरी आणि पर्यटकांसाठी आधुनिक व पर्यावरणपूरक धार्मिक, सांस्कृतिक आणि निवासी सुविधांची निर्मिती.




  • अत्याधुनिक सुविधा: सभामंडप, पोथीवाचन सभागृह, योग केंद्र, वस्तुसंग्रहालय, अन्नपूर्णा इमारत, शहानूर इमारत, दिंडी सभागृह, वसतिगृह, प्रवचन सभागृह आणि बहुउद्देशीय सभागृह.




  • पायाभूत सुविधा: शहानूर नदीवरील नवीन पूल, 2.40 किलोमीटर लांबीचा डांबरी रस्ता आणि संत रूपलालजी महाराजांचा भव्य पुतळा व इतर पुतळ्यांची उभारणी.




संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणाऱ्या संत रूपलालजी महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि धर्मप्रसाराचे महान कार्य केले. या राष्ट्रीय स्मारकामुळे बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांची राहण्याची व भोजनाची उत्तम सोय होणार असून हा परिसर एक प्रमुख सांस्कृतिक व आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित होईल. बैठकीत अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सविस्तर सादरीकरण केले. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis: मुंबईचा ऐतिहासिक वारसा समृद्ध होणार; शिवडी किल्ला आणि वरळी परिसराच्या संवर्धनाला वेग

मुंबई: मुंबईचा समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकपरंपरांचा वारसा जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत

Mumbai Crime News : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, दिंडोशीतून 1.28 कोटींचे अमली पदार्थ जप्त; तरुणाला अटक

Mumbai Crime News: मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई करत सुमारे 1.28 कोटी रुपये किमतीचे MD

BMC Education Department : महापालिका शिक्षण विभागातील काहींची मक्तेदारी आणि भ्रष्टाचार भाजप मोडित काढणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात काही व्यक्तींचे साटेलोटे असून त्यांच्या

BMC Hospitals : महापालिका रुग्णालयांमधील रुग्णांच्या ताटात बासमती भात, स्वस्त दरातील भाजीपाला,कडधान्य खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांसह प्रसुतीगृहांमध्ये आंतररुग्णांना दोन्ही वेळचे

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा सहभाग नाही; वकिलाचा दावा, 11 आरोपींवर MCOCA अंतर्गत कारवाई

Mumbai Crime News: अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा

Mumbai Crime News: '15 लाख दे, तरच...!', तक्रारदाराकडे मागितले पैसे; लाच घेताना आयकर निरीक्षकाला अटक

Mumbai Crime News: बेनामी मालमत्तेशी संबंधित विभागीय कारवाई बंद करण्यासाठी 15 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून