BMC चा अनोखा प्रयोग; कचरा टाकणाऱ्यांना आता एआय कॅमेरा देणार थेट इशारा

मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने माहीममध्ये कॅमेऱ्याचा पहिला प्रयोग केला आहे. कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम मुंबईच्या स्वच्छतेसाठी किती प्रभावी ठरणार, याकडे लक्ष लागले आहे.

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईत मोठ्या प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणांचे निर्मूलन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या उपाययोजनांमध्ये आता तंत्रज्ञानाची भर पडली आहे. अशा ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. यासाठी महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ प्रशासकीय विभागाकडून माहीम येथील गजानन वाटीका परिसरात एआय कॅमेरा बसविण्यात आला आहे. हा कॅमेरा कचरा फेकण्याआधीच संबंधित व्यक्तीला साव करतो आणि व्यक्तीची हालचाल टिपून स्वच्छतेचा संदेश देतो. महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने हा प्रयोगशील प्रयत्न केल्यानंतर उर्वरीत २२ ठिकाणांसह मुंबईतील इतरही ठिकाणी अशाचप्रकारे एआय आधारीत कॅमेरा बसवून कचरा फेकणाऱ्यांवर वॉच ठेवला जाणार आहे.



महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या नेतृत्वात घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याच अनुषंगाने, उप आयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) योगेश देसाई यांच्या पुढाकाराने हा प्रायोगिक तत्वावरील उपक्रम राबविण्यात येत आहे.





महापालिकेच्या दादर,माहिम आणि धारावीमध्ये एकूण २३ कचरा जमा होणारी संवेदनशील ठिकाणे असून त्यातील माहिम येथील गजानन वाटीका परिसरात असलेल्या मोठ्या प्रमाणात कचरा साचण्याच्या संभाव्य ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कॅमेरा जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्या संकल्पनेतून बसविण्यात आला आहे. या कॅमेऱ्यासोबत ध्वनीक्षेपक जोडण्यात आले आहेत. कचरा टाकण्यासाठी येथे येणाऱ्या व्यक्तीची हालचाल कॅमेऱ्यात टिपली जाते. त्यानंतर तत्काळ ध्वनिक्षेपकाद्वारे परिसर स्वच्छ ठेवण्याचे तसेच उघड्यावर कचरा न टाकण्याच्‍या आवाहनाची उद्घोषणा होते. या प्रयोगामुळे कचरा टाकणारी व्यक्ती परावृत्त होऊन संबंधित ठिकाणी कचरा टाकणार नाही आणि त्यामुळे परिसरात अस्वच्छता होत नाही. एकंदरीतच नागरिकांच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागरूकता वाढविणे आणि कचरा असुरक्षित ठिकाणी पुन्हा कचरा साचू नये, हा या प्रयोगामागील प्रमुख उद्देश आहे.


यासंदर्भात बोलतांना जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी आयुक्तांच्या निर्देशानुसार संभाव्य कचऱ्यांची ठिकाणे असलेल्या जागी कॅमेरा बसवण्याचे निर्देश आहेत. परंतु निव्वळ कॅमेरा लावून मूळ हेतू साध्य होणार नसल्याने त्याला ध्वनीक्षेपकाची जोड देवून त्या माध्यमातून कचरा फेकणाऱ्यांना अलर्ट केले जाते. कॅमेराच्या रेंजमध्ये संबंधित कचरा फेकणारी व्यक्ती आल्यास त्यांची हालचाल टिपून ध्वनीक्षेपकांवरुन तिथे कचरा टाकला टाकण्यापासून परावृत्त केले जाते.


या प्रयोगाच्या परिणामकारकतेचा आढावा घेऊन महानगरपालिकेच्या वतीने आगामी काळात मुंबईत विविध ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात येईल. तरीही, नागरिकांनी रस्त्यांवर, उघड्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी अथवा अन्यत्र कुठेही कचरा टाकू नये. तसेच, मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा मोठा मेगा ब्लॉक! डोंबिवली अन् घाटकोपरमध्ये रात्री धावणार नाही लोकल, अनेक गाड्यांचे मार्ग बदलले

मुंबई: मध्य रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. डोंबिवली स्थानकावरील नवीन उत्तर पादचारी पुलाचे

एमपीएससीच्या ९ परीक्षांच्या कथित पेपरफुटी प्रकरणाची चौकशी तीव्र; १६ नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्रासह निवेदने सादर करण्याचे आवाहन

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका आणि

Chandrakant Patil: ग्रंथालयांना दिलासा! राज्यातील १० हजार ३१२ ग्रंथालयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा

मुंबई: राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील सहाय्यक परिरक्षण अनुदानाचा

मुंबईत BMC च्या धूळ नियंत्रण मोहीम अंतर्गत ६९.५५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व पाडकामातून

मुंबई महापालिकेच्या आशा स्वयंसेविकांना पाच हजार रुपये दिवाळीभेट; महापौर रितू तावडे यांनी दिले आयुक्तांना निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांना दीपावली सणानिमित्त प्रत्येकी

अनधिकृत मासेमारीविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई; ₹15.46 कोटींचा दंड आकारला

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत नियमित