
मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांना दीपावली सणानिमित्त प्रत्येकी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याबाबत मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांनी महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना लेखी निर्देश दिले आहेत.
यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात महापौर रितू तावडे यांनी नमूद केले आहे की, मुबई महानगरपालिकेअंतर्गत सद्यस्थितीत एकूण 1,461 आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. या स्वयंसेविका अत्यंत अल्प मानधनावर आरोग्य सेवा, लसीकरण मोहीम तसेच विविध शासकीय लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण व कष्टाचे काम अविरतपणे करत असतात.
मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत नियमित गस्त, विशेष पथकांद्वारे देखरेख आणि ...
दीपावलीसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या सणाच्या काळातही सानुग्रह अनुदान देण्याबाबत या आशा स्वयंसेविकांचा विचार न होणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे या सर्व आशा स्वयंसेविकांना दीपावली सणानिमित्त प्रत्येकी 5,000 (पाच हजार) रुपयांचे सानुग्रह अनुदान तत्काळ मंजूर करून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.





