अनधिकृत मासेमारीविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई; ₹15.46 कोटींचा दंड आकारला

महाराष्ट्रात अनधिकृत मासेमारीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने कडक कारवाई केली आहे. 2021 ते 2026 या कालावधीत ₹15.46 कोटींचा दंड आकारण्यात आला असून ₹9.39 कोटी वसूल करण्यात आले आहेत. LED मासेमारी, पर्ससीन नौका आणि ड्रोनद्वारे देखरेख यांसह विभागाच्या कारवाईचा सविस्तर आढावा.

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत नियमित गस्त, विशेष पथकांद्वारे देखरेख आणि कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. 23 नोव्हेंबर 2021 ते 26 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अनधिकृत मासेमारीविरुद्ध एकूण 1,045 प्रतिवेदने दाखल करण्यात आली असून, त्यापैकी 976 प्रतिवेदने निकाली काढण्यात आली आहेत. या प्रकरणांमध्ये एकूण ₹15.46 कोटींचा दंड आकारण्यात आला असून, ₹9.39 कोटी वसूल करण्यात आले आहेत, अशी माहिती मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे यांनी दिली.


महाराष्ट्र राज्यातील सागरी मत्स्यसंपत्तीचे संवर्धन, अनधिकृत मासेमारीस प्रतिबंध आणि सागरी मासेमारीविषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 तसेच सुधारणा अधिनियम, 2021 अन्वये विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंमलबजावणी अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गस्त घालण्यात येते. तसेच, अनधिकृत LED आणि पर्ससीन मासेमारीला आळा घालण्यासाठी विशेष पथके गठित करण्यात आली आहेत.



विविध प्रकारच्या अनधिकृत मासेमारीविरुद्ध कारवाई


विभागामार्फत LED व LED पर्ससीन, पर्ससीन व मिनी पर्ससीन, ट्रॉलिंग तसेच परप्रांतीय मासेमारी नौकांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. उपलब्ध नोंदीनुसार, पर्ससीन व मिनी पर्ससीन मासेमारीच्या प्रकारात 364 प्रतिवेदने दाखल करण्यात आली आहेत. LED व LED पर्ससीन मासेमारीच्या प्रकरणांमध्ये ₹7.49 कोटींचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच, परप्रांतीय मासेमारी नौकांविरुद्ध 103 प्रतिवेदने दाखल करून ₹3.15 कोटींचा दंड आकारण्यात आला आहे.



नवीन मासेमारी हंगामात 31 नौकांवर कारवाई


नवीन मासेमारी हंगामात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या 31 नौकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. जिल्हानिहाय कारवाईमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात 12, मुंबई शहर जिल्ह्यात 9, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7, रायगड जिल्ह्यात 2, तर ठाणे-पालघर जिल्ह्यात 1 प्रकरण नोंदविण्यात आले आहे.



ड्रोनद्वारेही अनधिकृत मासेमारीवर देखरेख


अनधिकृत मासेमारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनद्वारे प्राप्त माहितीच्या आधारेही कारवाई करण्यात येत आहे. उपलब्ध अहवालानुसार, ड्रोनद्वारे नोंदविण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये एकूण 3,424 प्रतिवेदने दाखल करण्यात आली आहेत. या प्रकरणांमध्ये ₹2.30 कोटींचा दंड आकारण्यात आला असून, ₹62.62 लाख वसूल करण्यात आले आहेत.


सागरी मत्स्यसंपत्तीचे संरक्षण, कायदेशीर मासेमारी पद्धतींना प्रोत्साहन आणि अनधिकृत मासेमारीला प्रतिबंध करण्यासाठी विभागामार्फत नियमित गस्त, विशेष पथकांद्वारे देखरेख आणि कायद्यानुसार कारवाई सुरू राहणार आहे. सर्व मच्छीमारांनी लागू असलेल्या कायद्यांचे व नियमांचे पालन करून विभागाच्या कार्यवाहीस सहकार्य करावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई सेंट्रल-इंदौर स्पेशल ट्रेन आता आठवड्यातून 3 दिवस धावणार

मुंबई: प्रवाशांची वाढती गर्दी आणि सुविधा लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल-इंदौर स्पेशल ट्रेनच्या (09079/09080)

Mega Block: कसारा घाटात मेगाब्लॉक, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; अप-डाऊन रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून आसनगाव - कसारा तिसऱ्या मार्गिकेच्या प्रकल्पांतर्गत कसारा यार्डमध्ये

नसीरुद्दीन शाह 'सरफरोश'मधील 'गुलफाम हसन' प्रत्यक्षात उतरवत आहेत का?, अमीत साटम यांचा सवाल

भाजपा मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी विरोधकांच्या राजकारणावर टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेस आणि

Aditi Tatkare: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणा करण्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

मुंबई : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याचे

Devendra Fadnavis: मुंबईचा ऐतिहासिक वारसा समृद्ध होणार; शिवडी किल्ला आणि वरळी परिसराच्या संवर्धनाला वेग

मुंबई: मुंबईचा समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकपरंपरांचा वारसा जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत

Devendra Fadnavis: अंजनगाव सुर्जीमध्ये साकारणार संत रूपलालजी महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक; ₹80 कोटींच्या आराखड्याला मंजुरी

मुंबई: अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे वारकरी संप्रदायाचा गौरव वाढवणारे संत शिरोमणी रूपलालजी महाराज