MSRTC : एसटीच्या सवलतींसाठी NCMC कार्ड नोंदणी करा; महिला प्रवाशांना महामंडळाचे आवाहन

पात्र प्रवाशांना एसटीच्या विविध सवलतींचा लाभ सहज मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

MSRTC: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सर्व सवलतधारक प्रवाशांना राष्ट्रीय सामान्य वाहतूक कार्ड (NCMC) नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः महिला प्रवाशांनी नोव्हेंबर 2026 अखेरपर्यंत कार्डची नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. पात्र प्रवाशांना एसटीच्या विविध सवलतींचा लाभ सहज मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.



एसटी आगार आणि बसस्थानकांवर नोंदणीची सुविधा


शासनाच्या निर्णयानुसार, एसटी महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या पात्र प्रवाशांसाठी NCMC कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी एसटी आगार, बसस्थानके आणि प्रवाशांच्या सोयीच्या ठिकाणी अधिकृत एजन्सीच्या माध्यमातून नोंदणी व कार्ड वितरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.


अधिकृत केंद्रांवर सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नोंदणीची प्रक्रिया सुरू असल्याचे महामंडळाने म्हटले आहे. त्यामुळे प्रवाशांनी जवळच्या अधिकृत केंद्रावर जाऊन कार्ड नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




ग्रामीण भागात विशेष नोंदणी शिबिरे


ग्रामीण भागातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांच्यासह सर्व पात्र सवलतधारकांपर्यंत ही सुविधा पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या माध्यमातून नोंदणी व कार्ड वितरण शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


अंगणवाडी सेविका, आशा सेविका, गृहिणी आणि नोकरदार महिलांसह सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी सुलभ व्हावी, यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिबिरांचे आयोजन करण्यासाठी संबंधित कार्यालयांनी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाशी किंवा आगार प्रतिनिधींशी संपर्क साधावा.



सवलतींचा लाभ घेण्यासाठी कार्ड नोंदणी महत्त्वाची


एसटीच्या विविध सवलत योजनांचा लाभ पात्र प्रवाशांना विनाअडथळा मिळावा, यासाठी NCMC कार्ड नोंदणीला गती देण्यात येत आहे. त्यामुळे महिला प्रवाशांसह सर्व सवलतधारकांनी वेळेत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे.


Comments
Add Comment

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्री भीषण आग ! 17 दुचाकींसह 21 वाहने जळून खाक

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरातील चापेकर चौक परिसरात मध्यरात्री आगीची मोठी दुर्घटना घडली. येथील कुणाल मार्केट

Diwali Special Trains : दिवाळी आणि छठपूजेसाठी पुण्यातून 450 विशेष रेल्वे फेऱ्या; पुणे, हडपसर आणि खडकीहून गाड्या धावणार

 Diwali Speci

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather News: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत असताना आता हवामानात बदल झाला आहे.

Vidhan Parishad Election Result : पुणे, अमरावतीत महायुतीची बाजी, नागपुरात उलटफेर

- काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी; उबाठाचा मात्र सुफडा साफ, शरद पवार गटाला २ जागा मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर

विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत पुणे, अमरावतीत महायुतीची बाजी, नागपुरात उलटफेर

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांच्या निवडणुकीत नागपूर पदवीधर मतदारसंघाचा

Vidhan Parishad Election Result : नागपूर, अमरावती, पुण्यावर महायुतीचा झेंडा! विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस, उबाठाचा सुफडा साफ

भाजप २, शिवसेना १, शरद पवार गटाला २ जागा मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांच्या