Diwali Special Trains : दिवाळी आणि छठपूजेसाठी पुण्यातून 450 विशेष रेल्वे फेऱ्या; पुणे, हडपसर आणि खडकीहून गाड्या धावणार

1 नोव्हेंबरपासून पुणे, हडपसर आणि खडकी रेल्वे स्थानकांवरून विविध शहरांसाठी विशेष गाड्या धावणार आहेत













 Diwali Special Trains : दिवाळी आणि छठपूजेच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने दिलासा देणारी बातमी दिली आहे. सणासुदीच्या काळात रेल्वे स्थानकांवर आणि नियमित गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे रेल्वे विभागाकडून सुमारे 450 विशेष रेल्वे फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 1 नोव्हेंबरपासून पुणे, हडपसर आणि खडकी रेल्वे स्थानकांवरून विविध शहरांसाठी विशेष गाड्या धावणार आहेत. यामुळे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि इतर भागांत जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे.



पुणे रेल्वे स्थानकावरून विशेष गाड्या


पुणे ते दानापूर मार्गावर सर्वाधिक 63 विशेष रेल्वे फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गाडी क्रमांक 01449 पुण्याहून दररोज दुपारी 3.40 वाजता सुटणार आहे. तर गाडी क्रमांक 01450 दानापूरहून पुण्याकडे दररोज पहाटे 5 वाजता रवाना होणार आहे.


याशिवाय पुणे-अमरावती विशेष रेल्वेच्या 7 आणि पुणे-मुझफ्फरपूर विशेष रेल्वेच्या 6 फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक पर्याय मिळणार आहेत.



हडपसरहून गोरखपूरसाठी सर्वाधिक फेऱ्या


हडपसर रेल्वे स्थानकावरूनही उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हडपसर-गोरखपूर मार्गावर 32 फेऱ्या नियोजित आहेत. गाडी क्रमांक 01415 हडपसरहून सकाळी 7.05 वाजता सुटेल, तर गाडी क्रमांक 01416 गोरखपूरहून हडपसरकडे सायंकाळी 5.30 वाजता रवाना होईल.


याशिवाय हडपसर-नागपूर विशेष रेल्वेच्या 15, हडपसर-गाझीपूर सिटी रेल्वेच्या 12 आणि हडपसर-प्रयागराज विशेष रेल्वेच्या 5 फेऱ्या होणार आहेत.



खडकीहूनही विशेष रेल्वे सेवा


खडकी रेल्वे स्थानकावरून हजरत निजामुद्दीनसाठी 14 विशेष फेऱ्या नियोजित करण्यात आल्या आहेत. ही गाडी खडकीहून सायंकाळी 5.30 वाजता सुटणार आहे. तसेच खडकी-सांगानेर विशेष रेल्वेच्या 6 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.


सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी या विशेष गाड्या सुरू करण्यात येत आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाड्यांचे वेळापत्रक, थांबे आणि तिकीट उपलब्धता यांची अधिकृत रेल्वे संकेतस्थळावर किंवा आरक्षण केंद्रात खात्री करून घ्यावी.








Comments
Add Comment

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather News: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत असताना आता हवामानात बदल झाला आहे.

Vidhan Parishad Election Result : पुणे, अमरावतीत महायुतीची बाजी, नागपुरात उलटफेर

- काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी; उबाठाचा मात्र सुफडा साफ, शरद पवार गटाला २ जागा मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर

विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत पुणे, अमरावतीत महायुतीची बाजी, नागपुरात उलटफेर

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांच्या निवडणुकीत नागपूर पदवीधर मतदारसंघाचा

Vidhan Parishad Election Result : नागपूर, अमरावती, पुण्यावर महायुतीचा झेंडा! विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस, उबाठाचा सुफडा साफ

भाजप २, शिवसेना १, शरद पवार गटाला २ जागा मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांच्या

Pune News: पुण्यात महात्मा फुले स्मारकासाठी 230 कोटींचा प्रस्ताव मान्य, मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय

पुणे: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाडा परिसराच्या संपूर्ण विकासासाठी 230

MahaDBT 2.0: मच्छीमारांना आता घरबसल्या अर्ज करता येणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत 24 योजनांचा शुभारंभ

मुंबई: राज्यातील मच्छीमार, मत्स्यशेतकरी, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ