Badrinath Helicopter Crash Update: बद्रीनाथहून निघालेले हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये सहा जणांपैकी चौघांचा मृत्यू, दोन प्रवासी गंभीर जखमी

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील हॅलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये सहा पैकी चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी दोन प्रवासी गंभीर जखमी आहेत.

उत्तराखंड: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये बद्रीनाथ- डेहराडून दरम्यान धावणाऱ्या एका हॅलिकॉप्टरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. बद्रीनाथ धामवरून प्रवाशांना घेऊना जाणारे हॅलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या विमान दुर्घटनेमध्ये, 5 प्रवाशांसह एका पायलट जखमी झाल्याचे वृत्त होते. पण काही वेळांपूर्वी मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातामध्ये सहा जखमी झालेल्यांपैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन जण गंभीर जखमी आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचाव कार्याची सूत्रे हाती घेतली आहेत.



हॅलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना बद्रीनाथ आणि ज्योतीर्मठ दरम्यान झाल्याचे वृत्त आहे. ट्रान्स भारत कंपनीच्या असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये एक पायलट आणि पाच प्रवासी असे सहा जण होते. सर्व प्रवासी बंगळूरचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर बद्रीनाथहून डेहराडूनला जात होते आणि सहस्रधारा हेलिपॅडवर उतरणार होते. हेलिकॉप्टर खडकावर आदळून कोसळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अद्याप नेमक्या कोणत्या कारणामुळे, हॅलिकॉप्टर कोसळले? ही माहिती समोर आली नाही. SDRF, इतर पथकांसह आणि लष्कर पथक सुद्धा बचाव कार्यात आणि मदतकार्यात व्यग्र आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून, ट्रान्स भारत एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सर्व हेलिकॉप्टर्सचे सुद्धा उड्डाण रद्द करण्यात आले आहेत.





पायलटसोबत संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून घटनास्थळी आणखी एक पथक पाठवण्यात आले असल्याची माहिती उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाचे (UCADA) सीईओ प्रतीक जैन यांनी दिली. कॅप्टन हिमांशु (पायलट) आणि प्रथापा, अरुण, शंकर गौडा, सुधीर के आणि एसएस नटराजा (प्रवासी) असे सहा प्रवासी हॅलिकॉप्टरमध्ये होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अपघाताविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "जोशीमठ येथील चाई गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्दैवी बातमी मिळाली. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एसडीआरएफ हे तिन्ही पथक बचावकार्य एकत्रित रित्या करत आहेत. मी सुद्धा या संपूर्ण घटनेवर सतत लक्ष ठेवून आहे. मी गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्याचे निर्देश देत असून रुग्णांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश देत आहे. मी जखमींच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो."



नेमकी घटना काय घडली ?


खराब हवामान असूनही, शुक्रवारी बद्रीनाथसाठीची विमानसेवा सुरू होती. दुपारी 01.05 वाजता एक हेलिकॉप्टर डेहराडूनला पोहोचले. त्यानंतर दुसरे हॅलिकॉप्टर दुपारी 01.12 वाजता डेहराडूनच्या दिशेने निघाले आणि ते जोशीमठ परिसराजवळ अचानक रडारवरून बेपत्ता झाले. जोशीमठच्या मारवाडी भागाजवळील चाय गावच्या टेकडीजवळ या हॅलिकॉप्टरचा पुर्णपणे संवाद तुटला. सुरूवातीला हॅलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची भिती व्यक्त केली जात होती. मात्र तात्काळ चमोली जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान ते हॅलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळल्याचे निष्पन्न झाले.

Comments
Add Comment

Badrinath Helicopter Crash: मोठी दुर्घटना! बद्रीनाथहून निघालाले हेलिकॉप्टर जोशीमठमध्ये कोसळले, पायलटसह 6 जण बेपत्ता

उत्तराखंड: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धाम

Railway News: ग्राहकांसाठी खुशखबर! मुंबईसह 8 शहरांमध्ये रेल्वेकडून थेट पार्सल घरपोच; स्टेशनवर जाण्याची कटकट गेली

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने आता नागरिकांच्या सेवेसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतीय रेल्वेकडून आता

Kanpur Viral News: 'पहिली पूजा मीच करणार'...; करवा चौथच्या पूजेसाठी तीन पत्नींमध्ये पोलीस ठाण्यातच रंगली जुंपली

Kanpur Viral News: करवा चौथचा सण विवाहित महिलांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला दिवसभर

दोनदा मृत्यूच्या दाढेतून परतला कॅप्टन स्मित! डोक्याच्या फ्रॅक्चरनंतर डॉक्टरांनी सांगितलेले सत्य ऐकून बसेल धक्का

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लाईदुबाई विमान FZ1073 मधील एक धक्कादायक प्रकार 30 सप्टेंबरला समोर आला होता.  या विमानात

Arnab Cyclone: चक्रीवादळ ‘अर्णब’च्या संकटात केंद्र सरकार धावले; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मदतीचे आश्वासन

चक्रीवादळ 'अर्णब'मुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी

‘अर्णब’ चक्रीवादळाचा प्रभाव कायम! देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर 'अर्णब' हे अत्यंत तीव्र चक्रीवादळ काहीसे कमकुवत झाले असले, तरी त्याचा