Friday, October 30, 2026

Bandra Fire : वांद्रे पश्चिमेतील व्हीएन स्फिअर मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

घटनेची माहिती सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Mumbai News: मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरातील लिंकिंग रोडवरील व्हीएन स्फिअर मॉलमध्ये शुक्रवारी (30 ऑक्टोबर) सकाळी आग लागल्याची घटना घडली. मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. (Bandra Fire)

अग्निशमन दलाकडून लेव्हल 2 कॉल

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने (MFB) सकाळी 6 वाजून 28 मिनिटांनी या घटनेसाठी 'लेव्हल 2 फायर कॉल' घोषित केला. व्हीएन स्फिअर मॉल ही तळमजला आणि पाच मजले असलेली इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस, संबंधित वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, 108 रुग्णवाहिका आणि महापालिकेचे विभागीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग नियंत्रणात आणण्यासाठी आणि परिस्थिती हाताळण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले. (Mumbai Fire News)

जीवितहानीची नोंद नाही

प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत अद्याप कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. याबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >