
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील विद्युत वापराच्या पद्धतींचे आता सर्वकष मूल्यांकन करण्यात येणार असून यासाठी विजेच्या वापराचा आढावा घेण्यासाठी तांत्रिक समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये टाटा पॉवर, महापारेषण आणि महापालिका विद्युत व यांत्रिक विभागाचे निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश या समितीमध्ये असेल. ही समिती दोन महिन्यांमध्ये आपला अहवाल महापालिकेला सादर करणार असून यामध्ये विजेचा वापरासंदर्भात काही शिफारशी तसेच महापालिकेच्यावतीने निर्मित केल्या ऊर्जा प्रकल्पांबाबतच्या शिफारशी अपेक्षित आहेत.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासह विविध २६ प्रशासकीय कार्यालये तसेच इतर कार्यालयांमध्ये विजेचा वापर आणि ऊर्जा बचत आदींबाबत आढावा घेवून सर्वंकष अहवाल बनवण्यासाठी तांत्रिक समितीची निवड करण्याचा निर्णय यांत्रिक व विद्युत विभागाने घेतला आहे. त्यामध्ये तज्ज्ञ निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश असेल. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्याच्या वीज वापराच्या पद्धती, ऊर्जा बचतीची क्षमता तसेच महानगरपालिकेच्या मालकीच्या कॅप्टिव्ह वीज निर्मिती प्रकल्पांच्या कार्यक्षेत्राचा सर्वंकष निदानात्मक अहवाल या समितीकडून अपेक्षित आहे.
prahaar.in/2026/10/30/bengaluru-mumbai-vande-bharat-sleeper-train-launch-ashwini-vaishnaw-flag-off-click-here-for-all-updates/या समितीकडून विश्लेषणाचे काम व अहवाल हे विशेष स्वरूपाचे काम केले जाईल. तसेच आवश्यक तांत्रिक कौशल्याचे आणि वेळबद्ध स्वरूपाचे असल्याने या क्षेत्रातील तज्ञांचा समावेश या तांत्रिक समितीमध्ये करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या विविध विभागांमधील विद्युत वापराच्या पद्धतींचे आता सर्वकष मूल्यांकन करण्यात येणार आहे. तसेच ऊर्जा प्रकल्पांचा आढावा घेणे तसेच ओपन ऍक्सेसद्वारे वीज खरेदीच्या अनुषंगाने वीज खर्चाचे अनुकूलन करण्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या उद्देशाने ही तांत्रिक समिती गठित करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.






