
नाशिक: गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या क्षणाची नागरिक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज तो क्षण येऊन ठेपला. आज नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याला अधिकृत रित्या सुरूवात झाली आहे. ध्वजारोहणाच्या माध्यमातून आजपासून ह्या कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. या सोहळ्याची गिनिज बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. आज (31 ऑक्टोबर- शनिवार) सायंकाळी झालेल्या गोदावरी महाआरतीची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. आज सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाला याचे प्रमाणपत्र देखील मिळाले.
खरंतर, आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत ऐतिहासिक, मंगलमय आणि अभिमानाचा दिवस होता. देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिकच्या पवित्र रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र कुशावर्त तीर्थावर एकाच शुभमुहूर्तावर धर्मध्वजारोहण संपन्न झाले. या ऐतिहासिक सोहळ्याने सिंहस्थ कुंभमेळा 2027 चा विधिवत शुभारंभ झाला आहे. नाशिक ही प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, तर त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र. गोदावरी मातेचा उगम, रामायणाचा वारसा आणि संत-महंतांच्या तपश्चर्येने पवित्र झालेली ही भूमी भारतीय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे अद्वितीय प्रतीक आहे. त्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून भारताच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा, एकात्मतेचा आणि सनातन परंपरेचा वैश्विक उत्सव आहे.
सिंहस्थ कुंभपर्वाच्या मंगलमय पर्वात नाशिकच्या गोदावरी तीरावर आणखी एका ऐतिहासिक विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. तब्बल ६ हजार २३३ जणांनी एकत्रितपणे ...
आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व लोकप्रतिनिधी, तेरा आखाड्यांचे परमपूज्य साधू-महंत, तीर्थपुरोहित आणि हजारो श्रद्धाळू भाविक उपस्थित होते. तसेच हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस दल आणि विविध यंत्रणांमधील प्रत्येक घटकाने अहोरात्र परिश्रम घेतले.
या सोहळ्याच्या निमित्ताने सायंकाळी पवित्र गोदावरीच्या तीरावर झालेली भव्य गोदा आरती हा आणखी एक अविस्मरणीय क्षण ठरला. सुमारे सहा हजार पाचशे आदिवासी बांधव-भगिनींनी एकत्र येऊन गोदा आरती सादर केली. ही आपल्या सांस्कृतिक एकात्मतेची आणि सर्वसमावेशकतेची प्रतीकात्मक अभिव्यक्ती आहे. या आरतीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली नोंद ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
नाशिक: सिंहस्थ महाकुंभ हा केवळ धार्मिक उत्सव नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेची प्राणशक्ती आणि सामाजिक ऐक्याची अखंड ताकद आहे. या महाकुंभाच्या ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्र सरकारच्या भक्कम पाठबळामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळा जागतिक स्तरावर एक आदर्श धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने या कुंभमेळ्याच्या नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विभागांमध्ये समन्वय साधून पायाभूत सुविधा, रस्ते, वाहतूक व्यवस्था, घाटांचा विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, भाविकांसाठी निवास आणि सुरक्षा व्यवस्थेची कामे नियोजनबद्ध पद्धतीने पुढे नेण्यात येत आहेत.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात देश-विदेशातून कोट्यवधी भाविक नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक भाविकाला सुलभ दर्शन, सुरक्षित स्नान आणि उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी शासन कटिबद्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून डिजिटल, स्मार्ट आणि सुरक्षित कुंभमेळा साकारण्याचा आमचा संकल्प आहे. त्याचबरोबर स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून हरित कुंभमेळ्याची संकल्पनाही प्रत्यक्षात आणली जात आहे.
नाशिक : या पावन भूमीत प्रभू श्रीरामांचे चरणकमळ उमटले, त्याच नाशिकच्या दक्षिण गंगेच्या तीरावर आज आध्यात्मिक ऊर्जेचा महासागर उसळला. आगामी सिंहस्थ ...
2015 च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी व्यवस्थापनाचा अनुभव आपल्या पाठीशी आहे. त्या अनुभवातून मिळालेली शिकवण आणि यावेळच्या आधुनिक नियोजनाची सांगड घालून आगामी सिंहस्थ कुंभमेळा अधिक भव्य, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा कुंभमेळा संपल्यानंतरही नाशिकला कायमस्वरूपी उपयोगी पडणाऱ्या पायाभूत सुविधा आणि विकासकामांचा वारसा निर्माण व्हावा, ही आमची भूमिका आहे.
आजचा ध्वजारोहण सोहळा ही केवळ सुरुवात आहे. 'Well begun is half done' असे म्हणतात. चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम पूर्ण. आजचा ऐतिहासिक शुभारंभ आपल्याला अधिक मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. या पुढील काळात प्रशासन, संत-महंत, आखाडे, स्थानिक नागरिक, व्यापारी, स्वयंसेवी संस्था, युवक आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन या सिंहस्थ कुंभमेळ्याला यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे.
नाशिक : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त ध्वजपूजन सोहळा धार्मिक ...
नाशिककर आणि त्र्यंबकेश्वरकरांनी विकासकामांच्या काळात दाखवलेला संयम, सहकार्य आणि सकारात्मक सहभाग अत्यंत मोलाचा आहे. या सर्वांच्या सहकार्याने आणि परमपूज्य साधू-संतांच्या आशीर्वादाने आपण असा सिंहस्थ कुंभमेळा घडवू, जो केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी श्रद्धा, शिस्त, व्यवस्थापन, स्वच्छता आणि सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श ठरेल, असा मला ठाम विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.


