राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुशावर्त येथे सिंहस्थ ध्वजपूजन , गौतमी गंगा गोदावरीचे पूजन आरती

त्र्यंबकेश्वरमध्ये धार्मिक वातावरणात सोहळा संपन्न, पुरोहित संघातर्फे राष्ट्रपतींचा ताम्रपट देऊन सन्मान

नाशिक : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त ध्वजपूजन सोहळा धार्मिक व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते गौतमी गंगा गोदावरी पूजन, सिंहस्थ ध्वजपूजन, विशेष अर्घ्य अर्पण तसेच गोदावरी आरती करण्यात आली.



सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सोहळ्याला विशेष महत्त्व


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कुशावर्त येथे आगमन झाल्यानंतर धार्मिक विधींना प्रारंभ झाला. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात राष्ट्रपतींच्या हस्ते पवित्र गौतमी गंगा गोदावरीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर सिंहस्थ ध्वजाचे पूजन करण्यात आले. विशेष अर्घ्य अर्पण करून गोदावरीची आरती करण्यात आली. वैदिक मंत्रघोष आणि धार्मिक विधींमुळे कुशावर्त तीर्थ परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या धार्मिक सोहळ्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले. कुशावर्त तीर्थ हे गोदावरी नदीचे पवित्र स्थान असून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक परंपरेत या तीर्थाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.



‘व्हीआयपीं’ची मांदियाळी


या सोहळ्यास राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, रोहयो व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमास आमदार गोकुळ गीते, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, श्री हरिगिरीजी महाराज, विविध आखाड्यांचे साधू, महंत, स्थानिक राहिवासी आदी उपस्थित होते.


या प्रसंगी पुरोहित संघाच्यावतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सन्मानपूर्वक ताम्रपट प्रदान करण्यात आला.धार्मिक परंपरा, वैदिक मंत्रोच्चार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक महत्त्वाला अधोरेखित केले.

Comments
Add Comment

उत्तराखंड रन फॉर युनिटी आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामींच्या घोषणा; पीआरडी जवानांचे मानधन वाढणार, प्रत्येक ग्रामपंचायतीत क्रीडा क्लब!

[caption id="attachment_1070936" align="aligncenter" width="800"] राष्ट्रीय एकता दिनानिमित्त देहरादून येथील पॅव्हेलियन ग्राउंडवर ‘रन फॉर युनिटी’ या

El Nino ची पाठ फिरताच 2027 मध्ये येणार La Nina चं महासंकट; अतिवृष्टी आणि महापुराचा इशारा

जगभरातील हवामानाचे चक्र वेगाने बदलत असून आता एक नवीन आणि अत्यंत चिंतेची बातमी समोर आली आहे. एल निनोचा प्रभाव ओसरत

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वजातील प्रत्येक प्रतीकाचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या

Nashik : बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भूमीत सिंहस्थ कुंभपर्वाचा मंगलमय शंखनाद झाला

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी; तापमानात वाढ, काही भागांत हवेची गुणवत्ता खालावली!

शनिवारी ३१ ऑक्टोबर रोजी मुंबई आणि उपनगरातील काही भागांत सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाला, तर शहरभर अंशतः ढगाळ वातावरण

Latur Blast : लातूरमध्ये कुरिअरच्या टेम्पोत भीषण स्फोट; एक जण गंभीर जखमी, वाहनात बंदूक आढळल्याने खळबळ

Latur News: लातूर शहरात कुरिअरची पार्सल घेऊन आलेल्या एका टेम्पोमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. कुरिअरचे

Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ; लंडनहून परतलेल्या तरुणीचा आलिशान फ्लॅटमध्ये कुजलेला मृतदेह आढळला

गहुंजे येथील एका आलिशान गृहप्रकल्पात उच्चशिक्षित तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात प्रचंड