El Nino ची पाठ फिरताच 2027 मध्ये येणार La Nina चं महासंकट; अतिवृष्टी आणि महापुराचा इशारा

जागतिक हवामान संघटनेने 2027 च्या सुरुवातीला ला निनाचे मोठे संकट येण्याचा इशारा दिला असून, यामुळे जगभरात आणि भारतात अतिवृष्टी, महापूर आणि भयानक चक्रीवादळांचा धोका वाढणार आहे.

जगभरातील हवामानाचे चक्र वेगाने बदलत असून आता एक नवीन आणि अत्यंत चिंतेची बातमी समोर आली आहे. एल निनोचा प्रभाव ओसरत असतानाच आता आणखी एका नैसर्गिक संकटाची टांगती तलवार जगावर आली आहे. जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) प्राथमिक अंदाजानुसार, 2027 च्या सुरुवातीला प्रशांत महासागरात ला निनाची (La Nina) स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या हवामान बदलामुळे जगातील अनेक भागांमध्ये पाऊस, तापमान आणि वाऱ्यांच्या पद्धतीत मोठे बदल होणार आहेत, ज्याचे गंभीर परिणाम भारतालाही सहन करावे लागतील.


सध्या जगभरात एल निनोचे सावट असून अनेक देशांमध्ये दुष्काळसदृश भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातही काही भागांत तीव्र दुष्काळ तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि महाचक्रीवादळांचा तडाखा बसत आहे. अशातच हवामान विभागाने दिलेल्या नव्या इशाऱ्याने चिंता आणखी वाढवली आहे. एल निनोचा प्रभाव पूर्णपणे ओसरल्यानंतर लगेचच ला निनाचे चक्र सुरू होणार आहे, ज्यामुळे आगामी वर्ष अतिशय धोकादायक ठरू शकते.



फेब्रुवारी 2027 ठरणार सर्वात निर्णायक!


जागतिक हवामान संघटनेनं स्पष्ट केलंय की, फेब्रुवारी 2027 मध्ये ला निना प्रशांत महासागरात पूर्णपणे सक्रीय होईल. एल निनोचा प्रभाव जानेवारीपर्यंत कमी होऊन, त्यानंतर लगेचच ला निनाची स्थिती निर्माण होईल. हा बदल साधारणपणे 2 ते 7 वर्षांच्या कालावधीत घडणाऱ्या नैसर्गिक चक्राचा एक भाग आहे. या हवामान बदलामुळे अतिवृष्टी, तीव्र थंडी आणि महापुरासारख्या भयंकर आपत्ती ओढवू शकतात. विशेषतः किनारपट्टीवरील भागांना आणि शेतकर्‍यांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



ला निना म्हणजे नेमके काय?


जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचे तापमान अचानक थंड होते, तेव्हा पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब कमी होतो. यामुळे वारे पाण्याची वाफ ढगांच्या स्वरूपात पश्चिमेकडे घेऊन येतात आणि परिणामी तिथे मुसळधार अतिवृष्टी होते. या संपूर्ण नैसर्गिक प्रक्रियेला 'ला निना' असे म्हटले जाते. या प्रक्रियेमुळे येत्या काळात जगाला महापूर आणि चक्रीवादळांचा सामना करावा लागेल. त्यामुळे आगामी काळातील हवामानातील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे.

Comments
Add Comment

Census of India : 2027 च्या जनगणनेचे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी होणार सुरुवात, काही राज्यांमध्ये नोंदणी लांबणीवर

केंद्र सरकारने अखेर देशातील आगामी जनगणनेची अधिकृत घोषणा करत तिचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारताचे जनगणना

Delhi Fire : दिल्लीत मंगोलपुरी येथील कारखान्याला भीषण आग; 4 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Delhi News: दिल्लीतील मंगोलपुरी औद्योगिक क्षेत्रात असलेल्या पादत्राणे बनवण्याच्या कारखान्याला शुक्रवारी रात्री

ISRO : इस्रोची मोठी कामगिरी! भारताचा NVS-03 नेव्हिगेशन उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने शुक्रवारी भारताचा पुढील पिढीतील नेव्हिगेशन उपग्रह NVS-03

मुंबई- बेंगळुरू प्रवास आता सुस्साट, 988 Km चं अंतर फक्त 16 तासांत पूर्ण करता येणार

मुंबई: केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री- एच. डी. कुमारस्वामी, केंद्रीय ग्राहक व्यवहार- प्रल्हाद जोशी, अन्न

Vande Bharat Sleeper: रात्री वाराणसीला शांत झोपायचं अन् सकाळी दिल्लीत उठायचं! वंदे भारत स्लीपरचं पाहा संपूर्ण शेड्युल

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय रेल्वेकडून 'नाईट ट्रेन'ची घोषणा करण्यात आली होती. ही एक्स्प्रेस

Badrinath Helicopter Crash Update: बद्रीनाथहून निघालेले हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये सहा जणांपैकी चौघांचा मृत्यू, दोन प्रवासी गंभीर जखमी

उत्तराखंड: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये बद्रीनाथ- डेहराडून दरम्यान धावणाऱ्या एका हॅलिकॉप्टरचा अपघात