वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलटफेर
बांगलादेशने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना गमावल्याने भारतीय संघाला फायदा झाला. या सामन्यापूर्वी बांगलादेशचा संघ 55.56 विजयी टक्केवारीसह चौथ्या क्रमाकावंर होता. त भारतीय संघ 51.52 टक्क्यांसह पाचव्या स्थानावर होता. बांगलादेशचा वेस्ट इंडिजविरुद्ध पहिलाय कसोटी सामन्यात पराभव झाला आणि गुणातालिकेत उलथापालथ झाली. भारतीय संघ पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानी, तर बांगलादेशची चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. भारताच्या विजयी टक्केवारीत काहीच फरक पडलेला नाही. पण बांगलादेशने सामना गमावल्याने विजयी टक्केवारी कमी झाली आहे. बांगलादेशचा संघ 47.62 विजयी टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे. या विजयाचा वेस्ट इंडिजला विशेष फायदा झाला नाही, पण विजयी टक्केवारी 26.92 पर्यंत वाढली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला, पण सामना ...
भारतासाठी न्यूझीलंड कसोटी मालिका महत्त्वाची
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दोन सामन्यात भारताला काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडला क्लिन स्विप दिला तर भारताला थेट दुसरं स्थान गाठण्याची संधी आहे. इतकंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंति फेरीच्या शर्यतीत असेल. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका भारतासाठी महत्त्वाची असणार आहे.