Sunday, November 1, 2026

झुरळांचा त्रास विसरा! फक्त ३ घटकांपासून बनवा घरगुती स्प्रे; जाणून घ्या सोपी पद्धत

स्वयंपाकघरात, सिंकखाली, बाथरूममध्ये किंवा घरातील कोपऱ्यांमध्ये झुरळे सर्रास दिसतात. मात्र त्यांच्यामुळे विविध प्रकारचे आजार आणि घाण पसरते. त्यांना दूर ठेवण्यासाठी उपलब्ध असलेले महागडे स्प्रे आणि रासायनिक क्लिनर्स अनेकदा आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात आणि त्यांच्यामुळे तीव्र दुर्गंधीही येते. तुम्हाला माहित आहे का, की घरात फक्त तीन सोप्या घटकांचा वापर करून तुम्ही एक शक्तिशाली आणि नैसर्गिक झुरळनाशक स्प्रे तयार करू शकता, जो झुरळांना त्वरित पळवून लावेल? चला ही सोपी पद्धत जाणून घेऊया. स्प्रे बनवण्यासाठी लागणारे साहित्य बोरिक ऍसिड पावडर : २ मोठे चमचे ( झुरळे घालवण्यासाठी अतिशय प्रभावी) पांढरा व्हिनेगर : १/२ कप (स्वच्छता आणि दुर्गंधी घालवण्यासाठी) भांडी धुण्याचा साबण किंवा लिक्विड हँडवॉश : १ मोठा चमचा (द्रावण चिकट होण्यासाठी आणि झुरळांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून ) पाणी : १ ते १.५ कप
बनवण्याची पद्धत : सर्वप्रथम एका स्प्रे बॉटलमध्ये १ ते १.५ कप पाणी घ्या. त्यात अर्धा कप पांढरा व्हिनेगर आणि १ मोठा चमचा डिश सोप घालून चांगले हलवा. आता या मिश्रणात २ मोठे चमचे बोरिक ऍसिड पावडर घाला. बाटली घट्ट बंद करा आणि सर्व मिश्रण चांगले मिसळा जेणेकरून बोरिक ऍसिड पाण्यात पूर्णपणे विरघळेल. तुमचा घरगुती आणि प्रभावी झुरळनाशक स्प्रे तयार आहे. वापरण्याची योग्य पद्धत : हा स्प्रे सिंकच्या खाली, गॅसच्या मागे, रेफ्रिजिरेटरच्या खाली, कचरापेटीच्या भोवती, बाथरूमच्या कोपऱ्यांमध्ये आणि अशा सर्व ठिकाणी फवारा जिथे झुरळे किंवा त्यांची अंडी असण्याची शक्यता आहे. फवारणी करताना हातमोजे घाला आणि मुलांना व पाळीव प्राण्यांना त्या जागेपासून दूर ठेवा. बोरिक ऍसिड आरोग्यासाठी हानिकारक असू शकते म्हणून ते अन्न आणि पेयांपासून दूर ठेवा.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >