काय म्हणाला मिचेल सँटनर?
न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, 'मी नाणेफेक हरणार हे मी गृहीतच धरलं होतं. आम्ही गोलंदाजी करू. अर्थातच, खेळपट्टी नवीन आहे. नंतर थोडं दव पडण्याची शक्यता आहे. खेळपट्टीच्या आकारमानाशी लवकर जुळवून घ्यावं लागेल. ईडन पार्कप्रमाणे खेळपट्टीवर थोडी उसळी मिळाली तर छान होईल. अर्थातच, या संपूर्ण मालिकेत आमची फलंदाजी चांगली झाली आहे. मागच्या रात्री खेळपट्टी थोडी जास्त आतल्या बाजूला होती, जे वेगवान गोलंदाजांसाठी चांगलं होतं. एक बदल केला आहे. टिकनर परत आला आहे.'
काय म्हणाला श्रेयस अय्यर?
टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, 'या ऐतिहासिक मैदानावर येणे हा एक उत्तम प्रसंग आहे. आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो, प्रथम फलंदाजी करून स्वतःची परीक्षा घ्यायची होती. ऑकलंडमधील मैदानाचे आकारमान वेगळे होते. पण त्याचे श्रेय द्यायलाच हवे, फिलिप्सने अविश्वसनीय खेळी केली. दोन बदल संघात केले आहेत. वरुण आणि भुवी संघात आले आहेत. तो आपल्या संधीची वाट पाहत होता आणि आज खेळाडूंच्या घोळक्यातही त्याने एक सुंदर भाषण दिले.'
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं दोन वर्षांचं गणित असतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या पर्वाला 2025 पासून सुरूवात झाली आणि 2027 ला अंतिम सामना ...
दोन्ही संघांची प्लेइंग 11
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टिम सैफर्ट (विकेटकीपर), फिन ऍलन, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, ऍडम मिल्ने, जेकब डफी, ब्लेअर टिकनर.
भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वरुण चक्रवर्ती.