विराट कोहलीला नेट्समध्ये घाम फोडणारा नवा गोलंदाज! युवा वेगवान गोलंदाजाच्या माऱ्याने किंग कोहलीही वैतागला?

भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेपूर्वी नेट्समध्ये युवा वेगवान गोलंदाज औकिब नबीने विराट कोहलीला चांगलेच आव्हान दिले. नबीच्या स्विंग गोलंदाजीने कोहलीला अनेकदा चकवले. प्रसिद्ध कृष्णाच्या जागी संघात आलेल्या या गोलंदाजाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानावर भल्याभल्या गोलंदाजांची धुलाई करतो. मात्र, आगामी भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेपूर्वी सरावादरम्यान एका युवा भारतीय वेगवान गोलंदाजाने कोहलीला चांगलेच अडचणीत आणल्याची चर्चा रंगली आहे. नेट्समध्ये या गोलंदाजाच्या भेदक माऱ्याचा सामना करताना कोहलीला अनेकदा चेंडू खेळण्यात अडचणी आल्या. त्याच्या गोलंदाजीमुळे कोहली काहीसा वैतागल्याचे वृत्त समोर आले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिका संपत असताना आता सर्वांचे लक्ष आगामी वनडे मालिकेकडे लागले आहे. या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, केएल राहुल यांसारखे दिग्गज खेळाडू मैदानात उतरणार आहेत. पहिल्या वनडे सामन्याला अवघे 3 दिवस शिल्लक असताना भारतीय फलंदाजांनी नेट्समध्ये कसून सराव केला.


या सराव सत्रात युवा वेगवान गोलंदाज औकिब नबी, अंशुल कंबोज आणि गुरनूर ब्रार यांनी वरिष्ठ फलंदाजांसमोर तगडे आव्हान उभे केले. गुरनूर ब्रारने आपल्या उंचीचा फायदा घेत खेळपट्टीवरून अतिरिक्त उसळी मिळवली. त्यामुळे फलंदाजांना आखूड टप्प्याच्या चेंडूंचा सामना करताना सतर्क राहावे लागले. अंशुल कंबोजने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत फलंदाजांना अडचणीत आणले. मात्र, सर्वाधिक प्रभाव पाडला तो औकिब नबीने. 'रेव्हस्पोर्ट्स'च्या वृत्तानुसार, नबीने विराट कोहलीला वारंवार चकवले. त्याने दोन्ही बाजूंनी स्विंग होणारे चेंडू टाकत कोहलीच्या फलंदाजीची कसोटी पाहिली. त्याचे काही चेंडू कोहलीच्या बॅटला हुलकावणी देत थेट पॅड आणि मांडीच्या पॅडवर आदळले. त्यामुळे सरावादरम्यान कोहली काहीसा अस्वस्थ झाल्याचे सांगितले जात आहे.



विशेष म्हणजे, नबीने अलीकडेच न्यूझीलंडमधील लिंकन येथे इंडिया 'अ' संघाकडून पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात प्रभावी कामगिरी केली होती. दुखापतग्रस्त प्रसिद्ध कृष्णाच्या जागी त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, कोहलीने काही उत्कृष्ट फटके मारत आपली फलंदाजीची लयही दाखवून दिली. सरावादरम्यान रोहित शर्मासोबत त्याची चांगली गट्टी पाहायला मिळाली. रोहितने आक्रमक फलंदाजीपेक्षा बचावात्मक खेळावर भर दिला. केएल राहुलनेही नंतर सरावात सहभाग घेतला, तर ऋतुराज गायकवाडनेही वेगवान गोलंदाजांचा सामना केला. पहिल्या वनडेपूर्वी झालेल्या या सराव सत्रामुळे भारतीय फलंदाजांना खेळपट्टीचा अंदाज घेण्याची आणि वेगवान गोलंदाजीविरुद्ध तयारी करण्याची चांगली संधी मिळाली आहे. आता प्रत्यक्ष सामन्यात युवा गोलंदाज औकिब नबीला संधी मिळते का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

वैभव सूर्यवंशीला टीम इंडियातून घरी पाठवा! आकाश चोप्राचा संताप; रणजी क्रिकेट खेळण्याचा दिला सल्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या खेळण्याच्या संधीवरून नवा वाद निर्माण झाला

India A vs NZ A Test: कसोटी सामन्यात टीम इंडिया अडचणीत, जुरेलच्या शतकी झुंजार खेळीने वाचवला मान

क्राइस्टचर्चमधील ऐतिहासिक हॅगली ओव्हलवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या

WTC 2027: वेस्ट इंडिजने बांगलादेशला 8 विकेट राखून नमवलं, टीम इंडियाला थेट झाला फायदा

वेस्ट इंडिजचा संघ बांगलादेश दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत पहिला सामना ढाक्यात

Manisha Bhanwala : 'दंगल गर्ल' मनीषा भानवालाने रचला इतिहास; जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला

Manisha Bhanwala : भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवालाने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला आहे.

आयपीएल 2027 स्पर्धेत पुन्हा एकदा रोहित पर्व! मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर परतण्याची तयारी, झालं असं..

आयपीएल स्पर्धेत पाच वेळा जेतेपदावर नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सची कामगिरी गेल्या काही वर्षात निराशाजनक राहिली

IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव कुठे झाला? कर्णधार श्रेयस अय्यरने असं फोडलं खापर

भारताने सलग तीन सामन्यात न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे चौथ्या टी20 सामन्यात