वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठी उलथापालथ, न्यूझीलंड पहिल्या स्थानावर; भारतालाही होणार फायदा! कसं काय समजून घ्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. कारण आता थोड्याच कसोटी मालिका शिल्लक असून टॉप 2 जागांची चुरस वाढली आहे. त्यामुळे भारत न्यूझीलंड कसोटी मालिकेचं महत्त्व वाढलं आहे. कसं काय ते जाणून घ्या.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं दोन वर्षांचं गणित असतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या पर्वाला 2025 पासून सुरूवात झाली आणि 2027 ला अंतिम सामना होणार आहे. अंतिम सामन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतील टॉप 2 संघांना स्थान मिळतं. त्यामुळे या स्पर्धेत जबरदस्त चुरस असते आणि विजयी टक्केवारीवर टॉप 2 संघांचं गणित ठरवलं जातं. आता या शर्यतीत कसोटी खेळणाऱ्या नऊ संघांचा समावेश असून टॉप 2 जागांसाठी चुरस वाढली आहे. दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने पराभूत केलं आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेचं गणितच बदलून गेल आहे. यामुळे न्यूझीलंडला फायदा असून अव्वल स्थानी जागा मिळवाली आहे. न्यूझीलंडचा संघ 72.22 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. तर दक्षिण अफ्रिका 71.43 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडिजने बांगलादेशला पराभवाची धूळ चारल्यानं भारताला फायदा झाला आहे. भारतीय संघ 51.52 टक्क्यांसह चौथ्या स्थानी पोहोचला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील एकूण 10 कसोटी सामने शिल्लक आहेत. अजूनही एकाही संघाने अंतिम फेरीत आपली जागा पक्की केलेली नाही. या स्पर्धेत विजयासाठी 12 गुण, ड्रॉ साठी 4 गुण आणि सामना टाय झाला तर 6 गुण मिळतात. पण सर्व गणित हे विजयी टक्केवारीवरच असतं. चला जाणून घेऊयात गणित

  • न्यूझीलंडला भारत आणि श्रीलंकेविरुद्ध आपल्याच देशात दोन कसोटी मालिका खेळायच्या आहेत. या शिवाय ऑस्ट्रेलियात चार आणि पाकिस्तानात दोन कसोटी खेळायच्या आहेत. सध्याचं समीकरण पाहता यापैकी सात कसोटी सामने जिंकले तर टॉप 2 मधील जागा पक्की होईल.

  • दक्षिण अफ्रिकेचे सात सामने शिल्लक आहेत. यात पाच सामने आपल्याच देशात खेळणार आहेत. बांगलादेशविरुद्ध दोन आणि इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामने खेळायचे आहेत. तर उर्वरित दोन सामन्यांसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. पाच सामन्यात विजय मिळवला की टॉप 2 मधे खेळेल.

  • ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेविरुद्धची मालिका गमावल्याने टॉप 2 मधील स्थान गमावलं आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 69.23 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाला अजून 9 कसोटी खेळायच्या आहेत. त्यापैकी न्यूझीलंडविरुद्ध आपल्याच चार आणि भारत दौऱ्यावर 5 कसोटी आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 9 पैकी 5 कसोटी जिंकले तरी टॉप 2 मधे जागा मिळवेल.

  • बांगलादेशचे या पर्वातील पाच कसोटी सामने शिल्लक आहेत. यापैकी एक कसोटी सामना गमावला की अंतिम फेरीच्या शर्यतीतील गणित जवळपास संपुष्टात येईल. तर श्रीलंकेचे सहा सामने शिल्लक आहेत. सर्व सामने जिंकले तर विजयी टक्केवारी 66.67 टक्के होईल. दरम्यान, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या स्पर्धेतून आऊट आहेत.





भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित काय?


भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील 7 सामने शिल्लक आहेत. आता भारत न्यूझीलंड दौऱ्यावर असून दोन सामने खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्याच देशात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारताने हे सातही सामने जिंकले तर अंतिम फेरीत जागा मिळवता येईल. कारण भारताची विजयी टक्केवारी 70.37 टक्के होईल. सहा विजयांसह 65 टक्के, पाच विजय आणि एक ड्रॉ सामना ड्रा झाला तर दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल.

भारताने न्यूझीलंडमधील कसोटी मालिका 0-2 ने गमावली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 कसोटी सामने जिंकले तरी भारताची विजयी टक्केवारी ही 59.26 इतकी होईल. त्यामुळे भारताचं अंतिम फेरी गाठणं कठीण होईल. त्यामुळे आता भारतासाठी प्रत्येक सामना करो या मरोची स्थिती आहे.
Comments
Add Comment

ऑस्ट्रेलियाच्या लाजिरवाण्या पराभवावर डेव्हिड वॉर्नर संतापला! पॅट कमिन्सच्या संघाला सुनावले; म्हणाला, 'ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटची ओळख नाही!'

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Auqib Nabi : कोहलीला नेट्समध्ये चकवले, आता न्यूझीलंडविरुद्ध मैदान गाजवणार?

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

IND vs NZ 5th T20 : न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना; वैभवसह 3 खेळाडूंना मिळणार संधी?

हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरचा सामना आज (1 नोव्हेंबर) हॅमिल्टन

विराट कोहलीला नेट्समध्ये घाम फोडणारा नवा गोलंदाज! युवा वेगवान गोलंदाजाच्या माऱ्याने किंग कोहलीही वैतागला?

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानावर भल्याभल्या गोलंदाजांची धुलाई करतो. मात्र, आगामी

वैभव सूर्यवंशीला टीम इंडियातून घरी पाठवा! आकाश चोप्राचा संताप; रणजी क्रिकेट खेळण्याचा दिला सल्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्या खेळण्याच्या संधीवरून नवा वाद निर्माण झाला

India A vs NZ A Test: कसोटी सामन्यात टीम इंडिया अडचणीत, जुरेलच्या शतकी झुंजार खेळीने वाचवला मान

क्राइस्टचर्चमधील ऐतिहासिक हॅगली ओव्हलवर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या