
मुंबई: यंदाच्या वर्षी राज्य सरकारने जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये, अतिवृष्टी आणि पुरबाधित शेतकऱ्यांना किती कोटींची मदत केली, याचा लेखाजोखा आज मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी जाहीर केला आहे. राज्यामध्ये जून ते ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने 291 कोटी 91 लाख 4 हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. त्यापैकी, शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 262 कोटी 69 लाख 95 हजार रुपये, तर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी 29 कोटी 21 लाख 9 हजार रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.
काही आवाज काळाच्या पडद्याआड जात नाहीत, तर ते पिढ्यान्पिढ्या मनामनांत घुमत राहतात. लोकशाहीर विठ्ठल उमप हे असेच एक अजरामर व्यक्तिमत्त्व! आपल्या पहाडी ...
मदत- पुनर्वसन विभागाने याबाबत शासन निर्णय जारी करत माहिती दिली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत 3 लाख 9 हजार 289 बाधित शेतकऱ्यांच्या 2 लाख 68 हजार 918.29 हेक्टर क्षेत्रासाठी 262 कोटी 69 लाख 95 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या यादीमध्ये, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोकण आणि नाशिक विभागांतील बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर, या मदतीचा लाभ सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.
राज्यातील सर्व मत्स्यकास्तकार, मच्छीमार, मत्स्यव्यावसायिक आणि मच्छीमार संस्थांनी महाडीबीटी 2.0 (https://mahadbt2.maharashtra.gov.in/) या प्रणालीवर आधार क्रमांकाद्वारे ...
शेतीपिकांच्या नुकसानी निधिची मदत थेट लाभ हस्तांतरण वेबसाईटच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री जाधव पाटील यांनी दिली. प्रत्येक शेतकऱ्याला एका हंगामात एकदाच मदत मिळणार असल्याची माहिती मदत- पुनर्वसन मंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांना मदत देण्याच्या निकषाचे पालन करून कोणत्याही लाभार्थ्याला दुसऱ्यांदा मदत मिळणार नाही, याची खातरजमा तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालय करणार आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतजमिनीचेही नुकसान झाले होते. राज्यात शेतपिकाचे नुकसान झालेल्या 34 हजार 984 शेतकऱ्यांच्या 7 हजार 675.40 हेक्टर क्षेत्र जमिनीसाठी 29 कोटी 21 लाख 9 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अमरावती, नागपूर, कोकण, नाशिक आणि पुणे विभागांतील यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांचाही यात समावेश आहे.
नवी दिल्ली: देशामध्ये तयार होणाऱ्या पहिल्या स्वदेशी बुलेट ट्रेनचे काम प्रगती पथावर आहे. यामुळे देशातील रेल्वे क्षेत्रामध्ये एक नवीन अध्याय सुरू ...
शेतजमिनीच्या नुकसानीसाठी जमीनमालक असलेल्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विहित दराने जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळेल. जमिनीतील वाळू, गाळ किंवा क्षार काढणे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पात्र नुकसानीसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मिळणारी मदत बँकांनी कर्ज खात्यात किंवा अन्य वसुलीसाठी वळती करू नये, अशा सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना द्याव्यात, असेही मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले.




