Punjab Politics : पंजाबमध्ये 'आप'ला मोठा हादरा; एकाच दिवशी ३ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, भगवंत मान सरकारपुढील अडचणी वाढल्या

कुंवर विजय प्रताप सिंग, हरमीत सिंग पठाणमाजरा आणि चेतन सिंग जोरामजरा या तीन बड्या नेत्यांचा समावेश आहे. निवडणुका तोंडावर असताना एकाच दिवशी तीन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे.

चंदीगड : पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आम आदमी पक्षाच्या (AAP) तीन बंडखोर आमदारांनी सोमवारी दिल्लीत भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. यामध्ये कुंवर विजय प्रताप सिंग, हरमीत सिंग पठाणमाजरा आणि चेतन सिंग जोरामजरा या तीन बड्या नेत्यांचा समावेश आहे. निवडणुका तोंडावर असताना एकाच दिवशी तीन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे.



">पक्षाचा राजीनामा अन् थेट भाजप मुख्यालयात प्रवेश

हा संपूर्ण घटनाक्रम अत्यंत वेगाने घडला. अमृतसर उत्तरचे आमदार आणि माजी आयपीएस अधिकारी कुंवर विजय प्रताप सिंग यांनी सोमवारी सकाळीच पक्षाचा व आमदारकीचा राजीनामा दिला. तर हरमीत सिंग पठाणमाजरा आणि माजी मंत्री चेतन सिंग जोरामजरा यांनी रविवारीच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. सोमवारी सकाळी हे तिन्ही नेते दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आणि 'भाजपा जिंदाबाद'च्या घोषणा देत अधिकृतपणे भाजपचा गमछा परिधान केला.



उमेदवारी न मिळाल्याने पक्षाला जय महाराष्ट्र!


'आप'ने आगामी २०२७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाने अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली, परंतु पठाणमाजरा आणि जोरामजरा या दोघांची नावे त्यातून गायब होती. एवढेच नाही तर पक्षाने त्यांच्या मतदारसंघात नवीन प्रभारींची नियुक्ती केली होती. पक्षाकडून पुन्हा तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट होताच दोन्ही नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. पठाणमाजरा यांनी थेट अरविंद केजरीवाल यांच्याकडे राजीनामा पाठवला. तर समाना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे व मान सरकारमध्ये माजी कॅबिनेट मंत्री राहिलेल्या चेतन सिंग जोरामजरा यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून पक्षातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. "माझे मन आता या पक्षात उरलेले नाही आणि पंजाबची सध्याची स्थिती अत्यंत हृदयद्रावक आहे," अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली.



'पंजाबच्या विकासासाठी भाजप हाच योग्य पर्याय'


भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हरमीत सिंग पठाणमाजरा यांनी आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली. आगामी २०२७ ची विधानसभा निवडणूक ते सणौर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढण्यास उत्सुक आहेत. भाजप हा एक मजबूत राष्ट्रीय पक्ष असून पंजाबच्या प्रगतीसाठी आणि हितासाठी भाजपसोबत काम करणेच योग्य ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



भगवंत मान सरकारवर सडकून टीका


भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी या बंडखोर नेत्यांनी पंजाबमधील भगवंत मान सरकारवर गंभीर आरोप केले. राज्यातील वाढती ड्रग्जची समस्या, कायदा व सुव्यवस्थेचा बिघडलेला दर्जा, भ्रष्टाचार, राज्यावर वाढणारे कर्जाचे डोंगर आणि शेतकरी, शिक्षण व आरोग्याशी संबंधित दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेले अपयश या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पठाणमाजरा यांनी यापूर्वीही मतदारसंघातील पूरपरिस्थितीच्या व्यवस्थापनावरून स्वपक्षीय सरकारवर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.



२०२७ च्या निवडणुकीपूर्वी 'आप'समोर मोठे आव्हान


विधानसभा निवडणुका जवळ येत असताना सत्ताधारी आम आदमी पक्षात सुरू झालेली अंतर्गत गटबाजी आणि आमदारांची बंडखोरी यामुळे पक्ष नेतृत्वाची चिंता वाढली आहे. एकीकडे 'आप'ला आपली सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि भाजप पंजाबमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत.

Tags
Marathi newsPunjab newsbjpAAPpunjab politicsArvind KejriwalBreaking News Marathitrending news marathiLatest News TodayPolitical news updateBhagwant MannBhagwant Mann GovernmentPunjab Political NewsAAP MLA Join BJPAAP mla resignPunjab Political CrisisAAP vs BJPPunjab Election UpdatesAAP party shock
Comments
Add Comment

Murasu Cyclone : 'मुरासू' चक्रीवादळ आज रात्री उशिरा रौद्र रूप धारण करणार; हवामान विभागाचा इशारा

Murasu Cyclone : ‘अर्नब’ चक्रीवादळा'नंतर आता मुरासू चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरावर

Cyclone Murasu : मुरासू चक्रीवादळाचा 'या' राज्याला धोका ! ताशी 110 किमी वेगाने वाहणार वारे, किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा

Cyclone Murasu : ‘अर्नब’ चक्रीवादळा'नंतर आता मुरासू चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा

Vande Bharat Sleeper Express: 'वाराणसी जंक्शन– नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस' उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत, कसं असेल वेळापत्रक?

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी 'वाराणसी जंक्शन–

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्र्यांनी वाराणसी- नवी दिल्ली वंदे भारत स्लीपर ट्रेन्सला दाखवला हिरवा झेंडा

वाराणसी: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 31 ऑक्टोबर 2026 रोजी,

Honey Singh: हनी सिंगवर कोसळला दु:खाचा डोंगर, भाच्याचा रस्ते अपघातात मृत्यू

पंजाब: प्रसिद्ध सिंगर आणि रॅपर यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका रस्ते अपघातामध्ये,

नकली नाण्यांचा काळा बाजार उघड; 1 लाखांच्या बनावट नाण्यांसह चौघेजण ताब्यात

नवी दिल्ली: दिल्ली क्राइम ब्रँचने खोटी नाणी बनवणाऱ्या चौघांना अटक केली आहे. दिल्लीच्या क्राइम ब्रँचने 20