Bhandup : भांडुपमध्ये लग्नाच्या जेवणातून 30 जणांना विषबाधा; नवविवाहित जोडप्यासह वऱ्हाडी रुग्णालयात दाखल

सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Mumbai News: लग्नसमारंभातील भोजनानंतर नवविवाहित जोडप्यासह वऱ्हाडी मंडळींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना भांडुप-नाहूर परिसरात घडली आहे. 1 नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या या प्रकारात सुमारे 27 ते 30 जणांना त्रास झाला. त्यांना मुलुंड आणि विक्रोळी येथील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ( Bhandup Food Poisoning)



शेवटच्या पंगतीतील पाहुण्यांना त्रास


नाहूर पश्चिम येथील नालंदा बुद्ध विहार हॉलमध्ये 1 नोव्हेंबर रोजी लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जवळपास 400 जणांनी भोजन केले होते. मात्र, शेवटच्या पंगतीत जेवण केलेल्या 27 ते 30 जणांना काही वेळानंतर पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.


रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास त्रास वाढल्याने काही रुग्णांना मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल महानगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतरांना मुलुंडच्या कामगार रुग्णालयात आणि विक्रोळी येथील पालिका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.



डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू


रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये लहान मुले, महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. एका महिलेने स्वतःहून रुग्णालयातून सुटी घेतली असून, इतर रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे रुग्णांची प्रकृती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.


एम. टी. अग्रवाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजूसिंग राठोड यांनी सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली. काही रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, इतरांवर उपचार सुरू आहेत.



केटरिंग चालकाच्या निष्काळजीपणाचा आरोप


या घटनेनंतर नवऱ्या मुलाच्या नातेवाईकांनी जेवणाचे कंत्राट घेतलेल्या केटरिंग व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप केला आहे. मात्र, विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


दरम्यान, पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, संबंधित यंत्रणांकडून आवश्यक ती कार्यवाही केली जात असल्याची माहिती दिली आहे.


Comments
Add Comment

Nita Ambani : नीता अंबानींचा मोठा सामाजिक उपक्रम! कर्जतमध्ये 100 एकरांवर उभारणार ‘अनंत आश्रय’; 5 हजारांहून अधिक जणांना मिळणार निवारा

Mumbai News: रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून नीता अंबानी यांनी आणखी एका मोठ्या सामाजिक उपक्रमाची घोषणा केली आहे.

BMC New Building : मुंबई महापालिकेचे नवीन सभागृह 2029 मध्ये; टाऊन हॉल, जिमखान्यासह उभारणार नवी वास्तू

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदान येथील जुन्या क्रिडा

मुंबईतील 3,000 प्रदूषण मोजमाप LED फलकांची तपासणी होणार; महापालिकेचे थर्ड पार्टी ऑडिट

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईतील बांधकामाच्या ठिकाणी प्रदुषण नियंत्रणाच्या उपाययोजनांचा भाग म्हणून हवेच्या

BMC News: महापालिकेच्या नायर रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह! सातही इमारतींमध्ये बसवणार नवी सुरक्षा प्रणाली

मुंबई (सचिन धानजी) : रुग्णालयांमधील आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महापालिका रुग्णालयांचे ऑडीट

मुंबईत BMW कारचा थरार! महिला चालकाने अनेक वाहनांना उडवले; पोलिसांशीही घातली हुज्जत

मुंबईतील जुहू परिसरात एका महिला चालकाने आपल्या अलिशान कारने अनेक वाहनांना धडक देऊन अपघात घडवल्याची धक्कादायक

मध्य रेल्वेवरील 9 एक्स्प्रेसचा सुपरफास्ट दर्जा रद्द, तिकीट दरातही होणार कमी

मुंबई: मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाने नऊ सुपरफास्ट