
मुंबई: मुंबईतील भांडुप परिसरात लग्नसमारंभातील जेवण केल्यानंतर तब्बल 70 ते 100 वऱ्हाडींची प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली आहे. अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयामुळे बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लग्नाच्या जेवणामध्ये ‘खरवस’ खाल्ल्यानंतर काही जणांना अचानक त्रास जाणवू लागला. मात्र, विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अन्नाचे नमुने तपासल्यानंतरच कारण निश्चित होण्याची शक्यता आहे. खरवसमुळेच हा प्रकार घडला का? की जेवणातील अन्य पदार्थामुळे वऱ्हाड्यांना ही विषबाधा झाली आहे? याची चौकशी अन्न- औषध प्रशासन आणि पोलिसांकडून केली जात आहे. तपासातून काय समोर येते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पालघर : पालघर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डहाणू तालुक्यातील मतेगाव येथे बिबट्याने 65 वर्षीय महिला ...
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील भांडूप परिसरामध्ये, रविवारी नालंदा बुद्ध विहार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला जवळपास 500 पाहुण्यांची उपस्थित होती. लग्नामध्ये केलेल्या जेवणामुळे अनेक वऱ्हाड्यांना विषबाधेचा त्रास झाला. जेवण केल्यानंतर वऱ्हाड्यांना काही तासांनी उलट्या, मळमळ आणि अस्वस्थ वाटणे असे लक्षण दिसू लागले. रविवारी रात्री उशिरा घरी परतल्यानंतर पाहुण्यांना त्रास होऊ लागला. सर्वात जास्त आजारी ह्या वऱ्हाड्यांमध्ये वधू पडली आहे. तिच्यावर मुंबईतील एका खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. वैद्यकीय पथकांनी मुलुंड येथील एमटी अग्रवाल रुग्णालयात 22 रुग्णांवर, चार लहान मुलांना कामगार रुग्णालयामध्ये आणि इतर पाच रुग्णांना विक्रोळीतील एका रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.
मुंबई : सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न मिळावे, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात विशेष तपासणी ...
सर्व वऱ्हाड्यांना तात्काळ रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यामुळे सर्व वऱ्हाड्यांची प्रकृती स्थिर सध्या स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित झालेल्या काही रूग्णांना पुढच्या एक ते दोन दिवसांसाठी उपचार देण्यात येणार आहे. पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कॅटरर्सवर आणि हॉल मालकावर सुद्धा निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. सर्व वऱ्हाड्यांकडून कॅटरर्सवर आणि हॉल मालकावर तात्काळ अधिकृत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नेमक्या कोणत्या कारणामुळे वऱ्हाड्यांना विषबाधा झाली, याचा तपास मुंबई पोलीस आणि आरोग्य कर्मचारी करत आहे.




