देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र सासवड येथे उभारणार! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून प्रकल्पाची पाहणी

देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र (Road Safety Training and Research Institute) सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे येथे उभारण्यात येत असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली.

देशातील पहिले रस्ते सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र (Road Safety Training and Research Institute) सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे येथे उभारण्यात येत असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. केंद्राची उभारणी दर्जेदार, अत्याधुनिक आणि प्रभावी व्हावी, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. या पाहणीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र (Automated Testing Station – ATS), स्वयंचलित वाहनचालक चाचणी मार्ग (Automated Driving Testing Track – ADTT) तसेच प्रस्तावित रस्ता सुरक्षा प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या कामांचा आढावा घेतला.


सासवड येथील २५ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे वाहनांची तांत्रिक तपासणी आणि चालकांची चाचणी अधिक पारदर्शक, अचूक व वैज्ञानिक पद्धतीने होणार आहे. स्वयंचलित चाचणी केंद्रात सेन्सर्स आणि कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनांचे ब्रेक, सस्पेन्शन, दिवे आणि उत्सर्जन यांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे वाहनांच्या फिटनेस तपासणीसाठी लागणारा वेळ कमी होऊन रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची सुरक्षितता वाढण्यास मदत होईल. स्वयंचलित वाहनचालक चाचणी मार्गावर ८ आकाराचा मार्ग, एच आकाराचा मार्ग, चढ-उतार आणि वळणांचे ट्रॅक अशा विविध चाचण्यांद्वारे चालकांच्या कौशल्याचे मूल्यमापन केले जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि व्हिडिओ ॲनालिटिक्सच्या साहाय्याने या चाचण्या घेतल्या जाणार असल्याने चालकांना परवाना देण्याची प्रक्रिया अधिक वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह होईल.



राज्य रस्ता सुरक्षा प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या माध्यमातून मोटार वाहन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, बदलते मोटार वाहन कायदे, रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढण्यासोबतच रस्ता सुरक्षा विषयक कामकाज अधिक प्रभावी होईल. “रस्ते अपघात कमी करण्यासाठी केवळ नियमांची अंमलबजावणी पुरेशी नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. सासवड येथील हे केंद्र देशासाठी आदर्श ठरेल, अशा दर्जाने उभारले पाहिजे,” असे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिले. या केंद्रामुळे वाहनांची सुरक्षितता, चालकांचे कौशल्य आणि रस्ता सुरक्षा व्यवस्थेची गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार असून, महाराष्ट्राच्या रस्ता सुरक्षा क्षेत्रात हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Comments
Add Comment

Vande Bharat Express: कोकणवासीयांची महत्त्वाची इच्छा पूर्ण, मुंबई सीएसएमटी- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस 16 डब्ब्यांनी धावणार

[caption id="attachment_970683" align="aligncenter" width="650"] कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई सीएसएमटी- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल

Pune Metro Inauguration : पुणेकरांची प्रतीक्षा संपली! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन; उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत

पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी आणि प्रवास अधिक जलद बनवण्यासाठी एक मोठा निर्णय

Sangli : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर, गोपीचंद पडळकरांनी विजयाचा गुलाल उधळला

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर

Maharashtra Weather: राज्यात अवकाळी पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून कोकण अन् विदर्भाला इशारा

Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल

केंद्र सरकारकडून पुणेकरांना दिवाळी गिफ्ट, 21,800 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (3 नोव्हेंबर- मंगळवार) दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास, व्हिडिओ

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! मृद व जलसंधारण कामांसाठी समितीची स्थापना

मुंबई: राज्यामध्ये सध्या दुष्काळजन्य परिस्थिती ओढावली आहे. राज्य सरकारकडून दोन टप्प्यांमध्ये दुष्काळ जाहीर