अहिल्यानगर (मिलिंद बेंधळे, प्रतिनिधी): शहरातील फुटबॉल खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देत त्यांच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देणाऱ्या अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग २०२६ च्या पाचव्या सिझनसाठी खेळाडूंचा लिलाव नुकताच उत्साहात पार पडला. या लिलावात शहरातील गुणवंत फुटबॉलपटूंवर संघमालकांनी लाखो रुपयांची बोली लावली. विशेष म्हणजे, काही खेळाडूंसाठी तब्बल 20 लाख रुपयांपर्यंत बोली लागल्याने यंदाच्या स्पर्धेची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
नमोह फुटबॉल क्लबच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. नमोह फुटबॉल क्लबच्या ओनर नमिता फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्थानिक खेळाडूंना व्यावसायिक पद्धतीने खेळण्याची संधी मिळावी, त्यांच्यातील कौशल्याला प्रोत्साहन मिळावे आणि शहरात फुटबॉल संस्कृती अधिक बळकट व्हावी, हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. यंदा या स्पर्धेचे पाचवे पर्व रंगणार आहे.
मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर धडक कारवाई केली आहे. FDA ने मुंबई, पुणे, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरसह ...
शहरात नुकत्याच झालेल्या खेळाडू निवड व लिलाव प्रक्रियेत आठ संघांच्या मालकांनी सहभाग घेत आपल्या पसंतीच्या खेळाडूंना संघात स्थान देण्यासाठी चढाओढ केली. या लिलावाचे सूत्रसंचालन सनीत मुथा यांनी केले. विद्यादान सायन्स अकॅडमी, गुलमोहर स्पोर्ट्स क्लब, नवा मराठा न्यूज, डीइसी बेअरिंग, एमडी अँड आरडीएक्स, प्रॉस्प ऑरा आणि डॉक्टर बायो यांच्या वतीने खेळाडूंसाठी बोली लावण्यात आली.
यंदाच्या स्पर्धेत एमडी अँड आरडीएक्स इन्फ्रा, गुलमोहर चॅलेंजर्स, गांधी वॉरियर्स, डायनामिक स्ट्रायकर, एक्सलन्स अचिव्हर्स, विद्यादान अल्फा एक्स, डॉक्टर बायो आणि नवा मराठा योद्धा असे आठ संघ मैदानात उतरणार आहेत. या संघांमध्ये शहरातील 105 खेळाडूंचा समावेश असून, प्रत्येक संघाने आपली ताकद वाढविण्यासाठी गुणवंत खेळाडूंची निवड केली आहे.
मुंबई: महाराष्ट्र सरकारने जनतेला उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सामान्य, खेड्या ...
लिलावामध्ये खेळाडूंवर एक लाख रुपयांपासून ते तब्बल 20 लाख रुपयांपर्यंत बोली लावण्यात आली. आयुष गाडळकर, यदुवर कोकरे आणि भार्गव पिंपळे या खेळाडूंवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. आयुष गाडळकर याच्यासाठी गांधी वॉरियर्स, यदुवर कोकरे याच्यासाठी डायनॅमिक स्ट्रायकर, तर भार्गव पिंपळे याच्यासाठी विद्यादान अल्फा एक्स संघाने सर्वाधिक बोली लावली. या लिलावामुळे स्थानिक फुटबॉलपटूंच्या गुणवत्तेला मिळणारी व्यावसायिक मान्यता आणि त्यांच्या खेळाचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, स्पर्धेसाठी विजेत्या संघाकरिता तयार करण्यात आलेल्या करंडकाचे अनावरण नमिता फिरोदिया यांच्या हस्ते, तसेच संघमालक आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी संघमालक म्हणून ऋत्विक वाबळे, जोएब खान, चेतन गांधी, सिद्धार्थ मुनोत, आशिष टोटू, रोहित रामदिन, सचिन सेलोत, ॲड. ललित गुंदेचा, अभिनंदन आणि रुही भन्साळी यांच्यासह त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.