
मुंबई(सुहास शेलार): राज्यातील सातारा, सांगली आणि अहिल्यानगर या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निकालांतून तिन्ही जिल्ह्यांतील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांचे चित्र स्पष्ट झाले आहे. सातारा जिल्हा बँकेत भाजपने नऊ जागांसह सर्वाधिक संचालक निवडून आणले असून, राष्ट्रवादी काँग्रेसला आठ आणि शिवसेनेला चार जागा मिळाल्या आहेत. सांगली जिल्हा बँकेत काँग्रेसचे सहा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडे सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ असल्याचे चित्र आहे. अहिल्यानगर जिल्हा बँकेत विखे-थोरात यांच्या सहकार विकास पॅनेलने आघाडी घेतली आहे.(SATARA BJP WIN)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपने नऊ जागा मिळवत सर्वाधिक संचालक निवडून आणले. भाजपकडून सर्जेराव सावंत, जयकुमार गोरे, ज्ञानदेव रांजणे, अतुल भोसले, सोमनाथ धुमाळ, अर्जुन काळे, रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, नंदकुमार मोरे आणि चंद्रकांत जाधव विजयी झाले. यापैकी अतुल भोसले, सोमनाथ धुमाळ, रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आणि नंदकुमार मोरे यांची बिनविरोध निवड झाली होती.
मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पर्यावरणाचे रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणासाठी अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) हिच्या माध्यमातून एक ...
राष्ट्रवादी काँग्रेसने आठ जागा मिळवल्या. सत्यजित वीर, मकरंद पाटील आणि ऋतुजा पाटील-वाठारकर हे बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित जागांवर उदयसिंह पाटील-उंडाळकर, रूपाली राजापुरे, अजय भोसले, योगेश फडतरे आणि सुनील माने यांनी विजय मिळवला. शिवसेनेला चार जागा मिळाल्या. मंत्री शंभूराज देसाई, संजीवराजे नाईक-निंबाळकर, मंगल पाटील आणि दीपक चव्हाण हे शिवसेनेचे संचालक निवडून आले.(MAHARASHTRA ELECTION RESULTS)
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 जागांपैकी 15 संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी पूर्ण झाली. या बँकेत काँग्रेसचे सहा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडे मिळून ११ जागांचे संख्याबळ असून, बँकेवरील सत्ता स्थापनेच्या दृष्टीने त्यांचे पारडे जड झाले आहे.
काँग्रेसकडून विश्वजीत कदम, महेंद्र लाड, पूजा पाटील आणि वर्षा सावंत हे बिनविरोध निवडून आले होते. तर अण्णासाहेब कोरे आणि कृष्णा कांबळे यांनी विजय मिळवला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवराज पाटील, वैभव शिंदे आणि विराज नाईक हे बिनविरोध निवडून आले होते. संभाजी कचरे यांनी निवडणुकीत विजय मिळवला. या पक्षाचे एकूण पाच संचालक झाले आहेत.
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने जुलै-सप्टेंबर २०२६ या आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. या तिमाहीत बँकेचा स्वतंत्र ...
भाजपचे गोपीचंद पडळकर हे निवडणुकीत विजयी झाले असून, सतीश देशमुख, अपर्णा देशमुख, राहुल महाडिक आणि पृथ्वीराज पाटील हे बिनविरोध निवडून आले होते. भाजपचे एकूण पाच संचालक झाले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजितराव घोरपडे विजयी झाले असून, रणधीर नाईक हे बिनविरोध निवडून आले. या पक्षाचे दोन संचालक झाले आहेत. शिवसेनेचे तानाजी पाटील, अमोल बाबर आणि नितीन होनराव हे तिघेही बिनविरोध निवडून आले. अपक्ष संजयकाका पाटील यांनीही विजय मिळवला.(POLITICAL WAVE MAHARASHTRA)
अंतिम चित्र काय?
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दहा जागांचे निकाल जाहीर झाले. विखे-थोरात यांच्या सहकार विकास पॅनेलने आठ जागा मिळवल्या. या पॅनेलचे प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे, अनुराधा नागवडे, संगीता वाघ, गणपत सांगळे, वैभव पिचड आणि कारभारी जावळे हे विजयी झाले. सहकार परिवर्तन पॅनेलकडून खासदार निलेश लंके यांनी पारनेर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून विजय मिळवला. भाजपचे राम शिंदे यांच्या प्रणित गटाच्या ज्योती शिंदे यांनी कर्जत मतदारसंघातून, तर संजीवनी शिंदे यांनी अपक्ष म्हणून अकोले मतदारसंघातून विजय मिळवला. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये विखे-थोरात यांच्या पॅनेलने आघाडी घेतली असली, तरी बँकेतील सत्तेचे अंतिम समीकरण संचालकांच्या एकत्रित भूमिकेवर अवलंबून राहणार आहे.




