Devon Conway Injury: डेव्होन कॉनवे पहिल्या वनडेतून OUT मात्र, हेन्रीबाबत संभ्रम कायम; वन डे मालिकेआधीच न्यूझीलंड संघाला धक्का

सलामीवीर डेव्होन कॉनवे ऑकलंडमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर झाला आहे. सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे (Concussion) त्याला हा निर्णय घ्यावा लागला आहे.

Devon Conway Injury: भारताविरुद्धच्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेला ४ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. परंतु, या पूर्वीच यजमान न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण सलामीवीर डेव्होन कॉनवे ऑकलंडमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर झाला आहे. सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे (Concussion) त्याला हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वीच न्यूझीलंडच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.


मंगळवारी ईडन पार्कवर न्यूझीलंडच्या सर्व सत्रावेळी, कॉनवेची धडक वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीशी झाली, ज्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याला भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडावे लागले आहे. न्यूझीलंडचे अनेक प्रमुख खेळाडू आधीच दुखापतीमुळे या मालिकेला मुकणार आहेत. आता या यादीत कॉनवेचाही समावेश झाला आहे.



या अपघाताची माहिती न्यूझीलंड क्रिकेटने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. न्यूझीलंडचे दोन खेळाडू डेव्हन कॉनवे आणि मॅट हेन्री हे सराव सत्रादरम्यान झेल पकडण्याचा प्रयत्न करत असताना यांची एकमेकांशी जोरदार धडक झाली. धडकेनंतर संघाच्या वैद्यकीय पथकाने तातडीने दोन्ही खेळाडूंवर उपचार केले. तसेच त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे का, याचीही तपासणी वैद्यकीय पथकाकडून करण्यात आली. त्यामुळे ४ नोव्हेंबर रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो खेळू शकणार नाही.


दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या मॅट हेन्रीच्या दुखापतीचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नसून पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या खेळण्याबाबतही संभ्रम कायम आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघात डेव्होन कॉनवे हा सलामीवीर तर आहेच त्याचबरोबर तो यष्टीरक्षक म्हणून देखील भूमिका बजावत आहे. जर कॉनवे उपलब्ध नसेल तर, त्याच्या जागी टीम सायफर्ट खेळणाची शक्यता आहे.


न्यूझीलंडच्या दुखापतींचे सत्र काही थांबता थांबेना. याआधी संघाचे दोन महत्त्वाचे खेळाडू मार्क चॅपमन आणि रचिन रवींद्र हे देखील एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाले आहेत. मार्क चॅपमन हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे, तर रचिन रवींद्र अद्याप खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी न्यूझीलंडसमोर खेळाडूंच्या उपलब्धतेचे मोठे संकट उभे राहिले आहे.

Comments
Add Comment

IND vs NZ : पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? गिलने केला खुलासा

IND vs NZ 1st ODI: भारत न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिका ४ नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे. या मालिकेतील पहिल्या वनडे

IPL2027 : हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये जाणार? मुंबई इंडियन्ससोबत मोठ्या ट्रेडची चर्चा

Sports News: आयपीएल (IPL) 2027 च्या मिनी लिलावापूर्वी खेळाडूंच्या अदलाबदलीबाबत चर्चांना वेग आला आहे. मुंबई इंडियन्सचा

किमी अँटोनेली ते वैभव सूर्यवंशी! युवा चॅम्पियन्स घडवणार क्रीडाप्रेमींची नवी पिढी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात नव्या पिढीचे युवा खेळाडू केवळ विक्रम आणि विजेतेपदांसाठी चर्चेत नाहीत, तर ते भविष्यातील

आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, तिलक वर्माकडे कर्णधारपद; वैभव सूर्यवंशी-रजत पाटीदार संघात

एसीसी रायझिंग स्टार्स आशिया कप 2026 स्पर्धा 19 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी

भुवनेश्वर कुमारची क्रिकेट कारकिर्द संपली? पहिलं षटकं सोडलं तर वाईट स्थिती, न्यूझीलंडविरुद्ध असं घडलं

[caption id="attachment_1071471" align="aligncenter" width="800"] भुवनेश्वर कुमारने चार वर्षानंतर भारतीय संघात कमबॅक केल्याने जोरदार चर्चा रंगली होती.

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत पहिला विजय सोपा नाही, ऑकलँडमध्ये भारताचा असा आहे रेकॉर्ड

भारत न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका बुधवारपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना