Sports News: आयपीएल (IPL) 2027 च्या मिनी लिलावापूर्वी खेळाडूंच्या अदलाबदलीबाबत चर्चांना वेग आला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर आले आहे. या संभाव्य ट्रेडमुळे आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी क्रिकेटविश्वात चर्चांना सुरुवात झाली आहे.
Dreambeans : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज Google ने आपले नवे एक्सपेरिमेंटल ॲप00 ‘Dreambeans’ भारतात लॉन्च केले आहे. या अॅपच्या माध्यमातून वापरकर्त्यांना त्यांच्या ...
हार्दिकच्या बदल्यात अर्शदीप आणि विष्णू विनोद?
स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार, पंजाब किंग्स हार्दिक पांड्याला आपल्या संघात घेण्यास उत्सुक आहे. या संभाव्य करारात पंजाबकडून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि यष्टीरक्षक-फलंदाज विष्णू विनोद हे मुंबई इंडियन्समध्ये जाण्याची चर्चा आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, या अदलाबदलीचा प्रस्ताव मुंबई इंडियन्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मांडण्यात आला होता. त्यानंतर पंजाब किंग्सनेही या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या संभाव्य ट्रेडबाबत दोन्ही फ्रँचायझींकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. (Hardik Pandya IPL Trade Update )
मुंबई इंडियन्सला काय फायदा होऊ शकतो?
जसप्रीत बुमराहला साथ देण्यासाठी भारतीय वेगवान गोलंदाजाचा पर्याय आणि यष्टीरक्षणासाठी विश्वासार्ह खेळाडू मिळवण्याच्या दृष्टीने हा व्यवहार मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचा ठरू शकतो. दुसरीकडे, हार्दिकसारखा अष्टपैलू खेळाडू संघात आल्यास पंजाब किंग्सची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही मजबूत होऊ शकतात.
अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
खेळाडू कायम ठेवण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या संभाव्य ट्रेडबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आयपीएल नियामक मंडळाची मंजुरी आणि दोन्ही संघांची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच या व्यवहारावर शिक्कामोर्तब होईल.
हा ट्रेड प्रत्यक्षात झाल्यास आयपीएल 2027 पूर्वीची ही एक महत्त्वाची खेळाडू अदलाबदल ठरू शकते.