Jiya Shankar Breakup Rumours: 'हे काही बॉलीवूडचे चित्रपट नाही'... जिया शंकरचे ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम

बिग बॉस फेम अभिनेत्री जिया शंकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून करण धनकसोबतच्या ब्रेकअपच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.

Jiya Shankar Breakup Rumours: 'वेड' फेम अभिनेत्री जिया शंकर नेहमीच चर्चेचा विषय असते. कधी तिच्या ग्लॅमर लूकने तर कधी तिच्या पर्सनल लाईफमुळे. गेल्या अनेक दिवसांपासून जिया चर्चेत आहे ते तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. काही दिवसांपूर्वी जियाने तिचा प्रियकर करण धनकसोबत साखरपुडा झाल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली होती. परंतु अचानक जियाने सोशल मीडियावरून तिचा होणारा नवरा करण धनकला काढून टाकल्यामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले. त्यातच जियाने तिच्या इंस्टाग्रामवर क्रिप्टीक पोस्ट केल्याने अनेकांना त्यांचे ब्रेकअप झाले असे वाटत होते. परंतु या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी जियाने करणसोबतच्या हॅलोविन पार्टीचे फोटो शेअर केले होते आणि आता या अभिनेत्रीने करणसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करण्यासोबतच एक लांब नोट लिहिली आहे.


बिग बॉस फेम अभिनेत्री जिया शंकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून करण धनकसोबतच्या ब्रेकअपच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. यावेळी जियाने सांगितले की, ते दोघे एकत्र आहेत आणि त्यांचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच जियाने करणसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर काढलेले ब्लॅक अँड व्हाईट या फोटोंमध्ये हे जोडपे खूप मजा-मस्ती करताना दिसत आहे. जियाने या फोटोंसोबतच्या कॅप्शनमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.





जियाची सोशल मीडिया पोस्ट


जर तुम्हाला कोणी सांगितले नसेल की एकत्र राहायला शिकताना आयुष्य किती कठीण होऊ शकते, तर मी तुम्हाला सांगते, हे काही बॉलीवूडचे चित्रपट नाही.
इतर अनेक जोडप्यांप्रमाणेच, आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो, पण कधीकधी आमच्यात भांडणेही होतात. आमच्या विचारांत मतभेद आहेत आणि आम्ही एकमेकांसाठी अधिक चांगले बनण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही परिपूर्ण (perfect) नाही आहोत; आम्ही फक्त माणसे आहोत, ज्यांनी एकमेकांच्या प्रेमात पडून एकमेकांची निवड केली आहे. आम्ही एकमेकांचे उत्तम मित्र आहोत आणि शेवटी आमची एवढीच इच्छा आहे की, आम्ही सर्व गोष्टी समजून घेत या आयुष्यात एकत्र प्रगती करावी.



आतापासून, मी माझ्या सोशल मीडियावर काय शेअर करते, याबद्दल अधिक काळजी घेईन, जेणेकरून कोणत्याही चुकीच्या समजुतींना किंवा निराधार अफवांना वाव मिळणार नाही. माझ्या मंगेतराबद्दल किंवा आमच्या नात्याबद्दल जे काही बोलले गेले आहे, त्यात अजिबात तथ्य नाही.


चला, आता प्रेम आणि दयाळूपणे पुढे जाऊया, चालेल ना? मी तुम्हा सर्वांना प्रेम आणि शांततेसाठी शुभेच्छा देते. आशा आहे की तुम्हालाही तुमच्यासाठी अगदी योग्य असे प्रेम मिळेल.



कोण आहे करण धनक आणि जिया शंकर?


जिया शंकर ही एक लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री असून तिने "मेरी हनीकारक बीवी," "प्यार तूने क्या किया," आणि "लाल इश्क" सारख्या शोमध्ये काम केले आहे. तसेच तिने "बिग बॉस ओटीटी" मध्ये देखील भाग घेतला आहे. त्यानंतर रितेश देशमुख सोबत "वेड" या चित्रपटात देखील तिने काम केले आहे. तर करण धनक हा अमेरिकेत राहणारा उद्योजक आहे. याच वर्षी ऑगस्टमध्ये करण आणि जियाचे एंगेजमेंट झाली आहे.

Comments
Add Comment

Bollywood News : '5 कोटी दे नाहीतर....' अभिनेत्याला थेट धमकीचा फोन ; टायगर श्रॉफनंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर ?

Bollywood News : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच बॉलिवूडच्या आणखी एका

Tiger Shroff News : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मुंबई क्राईम ब्रँचने २२ वर्षीय महिलेला अटक केली; आरोपींच्या संख्येत वाढ

Tiger Shroff News : मुंबई क्राईम ब्रँचने बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात हरियाणातील कर्नाल येथून सुनेहा

Ramayan Advance Booking : 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! रिलीजच्या आधीच विकली गेली १३ लाखांहून अधिक तिकिटे

मुंबई : रणबीर कपूर, (Ranbir Kapoor) साई पल्लवी (Sai Pallavi) आणि 'रॉकिंग स्टार' यश (Yash) यांची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षीत 'रामायण'

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या अजरामर सुरांना उजाळा; ‘मृदगंध पुरस्कारां’चे 26 नोव्हेंबरला वितरण

काही आवाज काळाच्या पडद्याआड जात नाहीत, तर ते पिढ्यान्‌पिढ्या मनामनांत घुमत राहतात. लोकशाहीर विठ्ठल उमप हे असेच

Tu Mil Jaaye Song: किंग खानच्या वाढदिवशी फॅन्सला जबरदस्त गिफ्ट, 'किंग' चित्रपटातलं 'तू मिल जाए' गाणं रिलीज

मुंबई: बॉलिवूडचा किंग खान आज त्याचा 61 वा वाढदिवस साजरा करीत आहे. शाहरूख खानच्या वाढदिवसाचे निमित्त साधत त्याच्या

Shah Rukh Khan @61 : 'बाझिगर' ते 'जवान'... बॉलिवूडच्या 'किंग खान'चे ९ आयकॉनिक चित्रपट, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ!

मुंबई : बॉलिवूडचा 'किंग ऑफ रोमान्स' आणि जगभरातील करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता शाहरुख खान आज