Tuesday, November 3, 2026

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA सक्रिय, मुंबईतून 22 लाखांचा भेसळयुक्त साठा जप्त; अनेक दुकानांचे परवाने केले निलंबित

अन्न- औषध प्रशासनाकडून महाराष्ट्रामध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली आहे. महाराष्ट्रासह अनेक दुकानांवर धडक कारवाई करत दुकाने सील केले आहे.

मुंबई: अन्न- औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर धडक कारवाई केली आहे. FDA ने मुंबई, पुणे, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरसह वेगवेगळ्या परिसरातून 45 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करत 5 दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आहेत. कारवाई दरम्यान, FDA च्या अधिकाऱ्यांनी 3 जणांवर गुन्हा दाखल करत 2 जणांना अटक केली आहे. तर, प्रतिबंधित अन्न पदार्थांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले 2 वाहने जप्त केली असून 2 दुकानांना सील ठोकले आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावे, यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

राज्यामध्ये भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी सणासुदीच्या काळामध्ये FDA ने कारवाई केली आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक आणि वितरण रोखण्यासाठी FDA ने गेले दोन दिवस राज्यामध्ये कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागात विशेष तपासणी आणि धडक कारवाई करण्यात आली. कोकण आणि नाशिक विभागामध्ये लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करत दुकान सील करत वाहतूकीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले. तर, निकृष्ठ, भेसळ आणि असुरक्षित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांवरही FDA कडून कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान, मुंबई, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागामध्ये कारवाई केली.

मुंबईमध्ये 11 लाख 11 हजारांचा मु्द्देमाल जप्त करत 4002 किलोचा स्वीट हलवा आणि मिठाईचा साठा जप्त केला. मुंबईतील चेंबूर परिसरातील वेगवेगळ्या दुकानांवरही धडक कारवाई करण्यात आली. एका लक्झरी बसमधून ही कारवाई करण्यात येत होती. टिळक नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सांताक्रूझ- चेंबुर लिंक रोड वर तपासणी करण्यात आली. नियंत्रित तापमानशिवाय आणि अस्वच्छ परिस्थितीत अन्न पदार्थांची वाहतूक होत असल्यामुळे कारवाई करण्यात आली. तर, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागामध्ये मिठाई, खवा, फरसाण, खाद्यतेलसह इतरत्र अन्नपदार्थांवर कारवाई करण्यात आली. उत्पादन, साठवणूक व विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी करून निकृष्ट दर्जाचा, भेसळयुक्त अथवा असुरक्षित असल्याच्या संशयावरून 22 लाख 34 हजारांच्या किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला.

इतकंच नाही तर, FDA ने यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातही अनेक दुकानांचे परवाने निलंबित केले आहे. तर एका दुकानदाराला व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस धाडली आहे. FDA ने केलेल्या तपासणीमध्ये, अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे अथवा भेसळयुक्त असण्याचा संशय, अस्वच्छ परिस्थितीत अन्नपदार्थांची निर्मिती व साठवणूक, स्वच्छता व आरोग्यविषयक तरतुदींचे उल्लंघन, लेबलिंगविषयक त्रुटी तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री व वाहतूक अशा बाबी निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >