Ahilyanagar: माणुसकीच्या दिव्यांनी गरजूंची दिवाळी उजळली; विश्‍वशंकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून गरजूंना जीवनावश्‍यक साहित्याचे वाटप

रयत शिक्षण संस्थेच्या विश्‍वशंकर प्राथमिक विद्यालय, भिंगार येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना दीपावलीनिमित्त जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप केले. दीपावलीच्या सणानिमित्त केवळ स्वतःच्या घरात आनंद साजरा न करता समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्याही जीवनात आनंदाचा प्रकाश पोहोचविण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : दीपावली म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि मांगल्याचा सण! मात्र समाजातील प्रत्येक घटकाला हा सण आनंदाने साजरा करता येतोच असे नाही. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गरजू कुटुंबांना सणाच्या आनंदापासून वंचित राहावे लागते. अशा कुटुंबांच्या जीवनातही दीपावलीचा आनंद फुलावा, या उदात्त भावनेतून रयत शिक्षण संस्थेच्या विश्‍वशंकर प्राथमिक विद्यालय, भिंगार येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना दीपावलीनिमित्त जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप केले.
दीपावलीच्या सणानिमित्त केवळ स्वतःच्या घरात आनंद साजरा न करता समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्याही जीवनात आनंदाचा प्रकाश पोहोचविण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. त्यानुसार विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने तसेच स्वतः पुढाकार घेऊन दीपावलीसाठी आवश्‍यक असणाऱ्या विविध वस्तू जमा केल्या.


त्यानंतर शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांनी अहिल्यानगर शहरातील डीएसपी चौक, स्टेट बँक चौक, तसेच रेल्वे स्टेशन परिसरात जाऊन गरजू व वंचित नागरिकांना या साहित्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांच्या या संवेदनशील कृतीमुळे अनेक गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे हास्य फुलले. हा सामाजिक उपक्रम संस्थेच्या रितू दीदी ॲबट यांच्या प्रेरणेने, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य विजय बेरड यांच्या उपस्थितीत, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नारायण अनभुले यांच्या संकल्पनेतून उत्साहात पार पडला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राथमिक विभागातील सौ. प्रतिभा पाठक, सौ. मनिषा गवळी, भाग्यश्री धोंडे, ज्योती शेळके, रंजिता गलांडे आणि विजय कासार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच, माध्यमिक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कविता शिंदे, प्रदीप पाडळे, क्रांती घायतडक आणि जयश्री मोरे यांनीही विद्यार्थ्यांसह प्रत्यक्ष उपस्थित राहून साहित्य वाटपाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.



या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ गरजू व्यक्तींना वस्तूंचे वाटप करण्याचा अनुभव मिळाला नाही, तर समाजातील वंचित घटकांच्या अडचणी समजून घेण्याची संधीही मिळाली. दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवणे, गरजूंच्या मदतीला धावून जाणे, सहकार्याची भावना जोपासणे आणि सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारणे अशा महत्त्वपूर्ण मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये झाली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामाजिक आणि नैतिक मूल्यांचे संस्कार होणे आवश्‍यक आहे. याच विचारातून राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांना माणुसकीचा प्रत्यक्ष धडा देणारा ठरला. ‘दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे, हीच खऱ्या अर्थाने दीपावली,’ हा माणुसकीचा सुंदर संदेश देत विश्‍वशंकर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दीपावलीचा खरा साजरा केला.

Comments
Add Comment

Winter tips: हिवाळ्यात ओठांची कशी घ्यावी योग्य काळजी? जाणून घ्या टिप्स

या थंडीच्या दिवसांत त्वचेसोबतच ओठांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. हिवाळ्यात थंड हवा, कमी आर्द्रता आणि

16 जागांवर सहकार विकास पॅनलचा दणदणीत विजय; डॉ. सुजय विखेंनी मानले मतदारांचे आभार

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा

Central Railway: मध्य रेल्वेची दिवाळी भेट; मुंबई-नागपूर मार्गावर धावणार अतिरिक्त विशेष गाड्या

दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी

कंपन्या, संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहभागातून अतिरिक्त निधी उभारणार; मुख्यमंत्री सहायता निधीला सामाजिक सहभागाचे बळ

मुंबई : दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती आणि अन्य आपत्कालीन परिस्थितीत बाधित नागरिकांसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल

Last Man In Tower: मनोज वाजपेयी, दिव्या दत्ता आणि बोमन इराणी अभिनीत ‘लास्ट मॅन इन टॉवर’चा प्रीमियर 6 नोव्हेंबर रोजी हिंदी Zee 5 वर प्रदर्शित

Last Man In Tower: सतत बदलत जाणाऱ्या शहरात, काही गोष्टी मागे सोडणे कठीण असते. हेच मनोज वाजपेयी, बोमन इराणी आणि दिव्या दत्ता

मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार: लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेचे मोठे पाऊल, 32 नव्या गाड्यांचे नियोजन

पश्चिम रेल्वेने मुंबईतील वाढती प्रवासी गर्दी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील वेटिंग लिस्टची समस्या दूर