Tuesday, November 3, 2026

Jiya Shankar Breakup Rumours: 'हे काही बॉलीवूडचे चित्रपट नाही'... जिया शंकरचे ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम

बिग बॉस फेम अभिनेत्री जिया शंकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून करण धनकसोबतच्या ब्रेकअपच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत.

Jiya Shankar Breakup Rumours: 'वेड' फेम अभिनेत्री जिया शंकर नेहमीच चर्चेचा विषय असते. कधी तिच्या ग्लॅमर लूकने तर कधी तिच्या पर्सनल लाईफमुळे. गेल्या अनेक दिवसांपासून जिया चर्चेत आहे ते तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. काही दिवसांपूर्वी जियाने तिचा प्रियकर करण धनकसोबत साखरपुडा झाल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली होती. परंतु अचानक जियाने सोशल मीडियावरून तिचा होणारा नवरा करण धनकला काढून टाकल्यामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले. त्यातच जियाने तिच्या इंस्टाग्रामवर क्रिप्टीक पोस्ट केल्याने अनेकांना त्यांचे ब्रेकअप झाले असे वाटत होते. परंतु या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी जियाने करणसोबतच्या हॅलोविन पार्टीचे फोटो शेअर केले होते आणि आता या अभिनेत्रीने करणसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करण्यासोबतच एक लांब नोट लिहिली आहे.

बिग बॉस फेम अभिनेत्री जिया शंकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून करण धनकसोबतच्या ब्रेकअपच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. यावेळी जियाने सांगितले की, ते दोघे एकत्र आहेत आणि त्यांचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच जियाने करणसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर काढलेले ब्लॅक अँड व्हाईट या फोटोंमध्ये हे जोडपे खूप मजा-मस्ती करताना दिसत आहे. जियाने या फोटोंसोबतच्या कॅप्शनमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 
View this post on Instagram
 

A post shared by Jiyaa Shankar (@jiyaashankarofficial)

जियाची सोशल मीडिया पोस्ट

जर तुम्हाला कोणी सांगितले नसेल की एकत्र राहायला शिकताना आयुष्य किती कठीण होऊ शकते, तर मी तुम्हाला सांगते, हे काही बॉलीवूडचे चित्रपट नाही. इतर अनेक जोडप्यांप्रमाणेच, आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो, पण कधीकधी आमच्यात भांडणेही होतात. आमच्या विचारांत मतभेद आहेत आणि आम्ही एकमेकांसाठी अधिक चांगले बनण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही परिपूर्ण (perfect) नाही आहोत; आम्ही फक्त माणसे आहोत, ज्यांनी एकमेकांच्या प्रेमात पडून एकमेकांची निवड केली आहे. आम्ही एकमेकांचे उत्तम मित्र आहोत आणि शेवटी आमची एवढीच इच्छा आहे की, आम्ही सर्व गोष्टी समजून घेत या आयुष्यात एकत्र प्रगती करावी.

आतापासून, मी माझ्या सोशल मीडियावर काय शेअर करते, याबद्दल अधिक काळजी घेईन, जेणेकरून कोणत्याही चुकीच्या समजुतींना किंवा निराधार अफवांना वाव मिळणार नाही. माझ्या मंगेतराबद्दल किंवा आमच्या नात्याबद्दल जे काही बोलले गेले आहे, त्यात अजिबात तथ्य नाही.

चला, आता प्रेम आणि दयाळूपणे पुढे जाऊया, चालेल ना? मी तुम्हा सर्वांना प्रेम आणि शांततेसाठी शुभेच्छा देते. आशा आहे की तुम्हालाही तुमच्यासाठी अगदी योग्य असे प्रेम मिळेल.

कोण आहे करण धनक आणि जिया शंकर?

जिया शंकर ही एक लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री असून तिने "मेरी हनीकारक बीवी," "प्यार तूने क्या किया," आणि "लाल इश्क" सारख्या शोमध्ये काम केले आहे. तसेच तिने "बिग बॉस ओटीटी" मध्ये देखील भाग घेतला आहे. त्यानंतर रितेश देशमुख सोबत "वेड" या चित्रपटात देखील तिने काम केले आहे. तर करण धनक हा अमेरिकेत राहणारा उद्योजक आहे. याच वर्षी ऑगस्टमध्ये करण आणि जियाचे एंगेजमेंट झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >