मुंबई: प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही दररोज रेल्वेने प्रवास करतायत तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वेवरील तिकिट तपासणी अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. सणासुदीच्या दिवसानिमित्त मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर उपनगरांमधून नागरिक शॉपिंगसाठी येत असतात. तिकिट तपासणी मोहिमेदरम्यान, टीसी अधिकाऱ्यांनी विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसूल 15 दिवसांमध्ये पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल विभागाने लाखो रूपयांचा दंड वसूल केला आहे.
पश्चिम रेल्वेने मुंबईतील वाढती प्रवासी गर्दी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील वेटिंग लिस्टची समस्या दूर करण्यासाठी एका मोठ्या प्रकल्पाची आखणी ...
दिवाळी सणादरम्यान तिकीटविरहित प्रवासाला आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांनी अधिकृत रित्या प्रवास करावा यासाठी ही विशेष मोहीम सुरू करण्यामागील प्रमुख उद्देश आहे. दिवाळी सणादरम्यान प्रवाशांची संभाव्य अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने 31 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2026 या कालावधीत 15 दिवसांची विशेष सखोल तिकीट तपासणी मोहिम ‘ऑपरेशन डीप’ सुरू केली आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "सणासुदीच्या काळात रेल्वेला प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. गर्दीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रवासाची शिस्त राखण्यासाठी, विविध रेल्वे स्थानकांवर तसेच मुंबई मध्य विभागातील गाड्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत."
मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पर्यावरणाचे रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणासाठी अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) हिच्या माध्यमातून एक ...
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पुढे म्हणाले की, "या विशेष मोहिमेअंतर्गत ‘डीप’ या शब्दावर चार महत्त्वाच्या पैलूंवर रेल्वे प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. यामध्ये तिकिटांशिवाय आणि अनियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सक्रियपणे ओळख पटवणे, तिकीट आणि वैध ओळखपत्रांची तपासणी आणि पडताळणी करणे, गर्दी रोखण्यासाठी रेल्वे नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आणि रेल्वे कायद्याच्या तरतुदींनुसार उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आकारणे यांचा समावेश आहे."
पश्चिम रेल्वेकडून कायमच सर्व रेल्वे प्रवाशांना वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून त्यांचा प्रवास सोयीस्कर राहील. शिवाय, त्रासमुक्त आणि दंडात्मक कारवाई टाळता येईल. डिजीटल तिकीट बुकिंगच्या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी प्रवाशांना पश्चिम रेल्वेकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे.