Gold Price Outlook : सोन्याच्या दरात आणखी घसरण होणार ?

आगामी काळात सोन्याच्या दराची दिशा ठरवण्यासाठी अमेरिकेतील आर्थिक घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत. अमेरिकेतील निवडणुका, बेरोजगारीचे आकडे आणि नॉन-फार्म पेरोल डेटा याकडे जागतिक बाजाराचे लक्ष लागले आहे.

Gold Price Outlook : सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत असून, आगामी काळात सोन्याचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वर्षाच्या सुरुवातीला सोने प्रति औंस 5,500 डॉलरच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचले होते. मात्र, आता सोन्याच्या बाजारातील चित्र बदलले असून, दर प्रति औंस 4,000 डॉलरच्या खाली आले आहेत. यंदाच्या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 8 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सोन्यावरील दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.



10 ग्रॅम सोन्याचे दर 15 हजारांहून कमी होणार ?


सोन्याच्या किमतीत आणखी मोठी घसरण होण्याचा अंदाज प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म नोमुराने व्यक्त केला आहे. नोमुराच्या ताज्या संशोधन अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 3,500 डॉलरपर्यंत खाली येऊ शकतो. सध्या सोन्याचा भाव प्रति औंस 3,947 डॉलरच्या आसपास असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. या पातळीवरून सोन्याच्या दरात आणखी जवळपास 11 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता आहे.


भारतीय बाजाराचा विचार केल्यास, सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे 1 लाख 39 हजार रुपये आहे. नोमुराच्या अंदाजानुसार सोन्याच्या दरात 11 टक्क्यांची घसरण झाल्यास 10 ग्रॅम सोन्याची किंमत जवळपास 15 हजार 290 रुपयांनी कमी होऊ शकते. त्यामुळे सोन्याचा भाव 1 लाख 23 हजार रुपयांच्या आसपास येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



सोन्याच्या दरात घसरण का सुरू आहे?


सोन्याच्या किमतीतील घसरणीमागे बाजारातील गुंतवणूकदारांची नफावसूली हे प्रमुख कारण असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी आणि रिसर्च विश्लेषक जतिन त्रिवेदी यांच्या मते, गुंतवणूकदारांकडून सातत्याने नफा वसूल केला जात असल्याने सोन्याच्या दरावर दबाव निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे सोने आता ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ पोहोचत आहे. सोन्याच्या दरात टिकाऊ तेजी येण्यासाठी बाजारात नव्याने खरेदी वाढणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत मिळणेही महत्त्वाचे ठरणार आहे.



अमेरिकेतील निवडणुका आणि आर्थिक आकडेवारीवर बाजाराची नजर


आगामी काळात सोन्याच्या दराची दिशा ठरवण्यासाठी अमेरिकेतील आर्थिक घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत. अमेरिकेतील निवडणुका, बेरोजगारीचे आकडे आणि नॉन-फार्म पेरोल डेटा याकडे जागतिक बाजाराचे लक्ष लागले आहे. या आकडेवारीवरून अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह आगामी काळात व्याजदरांबाबत कोणती भूमिका घेणार, याचे संकेत मिळू शकतात. तांत्रिक विश्लेषणानुसार, भारतीय बाजारात सोन्यासाठी 1 लाख 42 हजार रुपयांची पातळी महत्त्वाची रेजिस्टन्स मानली जात आहे. सोन्याचा भाव या पातळीच्या वर टिकून राहण्यात यशस्वी होत नाही, तोपर्यंत अल्पकालीन तेजीची शक्यता मर्यादित राहू शकते.



अमेरिकेच्या मिडटर्म निवडणुकांचा सोन्याच्या दरावर परिणाम ?


कोटक निओच्या एव्हीपी कायनात चेनवाला यांच्या मते, अमेरिकेतील मिडटर्म निवडणुकांचे निकालही सोन्याच्या किमतीवर प्रभाव टाकू शकतात.या निवडणुकांमधून अमेरिकेच्या आगामी ऊर्जा धोरणाबाबत संकेत मिळण्याची शक्यता आहे. तसेच इराणच्या मुद्द्यावर वॉशिंग्टनची पुढील भूमिका काय असेल, याकडेही बाजाराचे लक्ष राहणार आहे. अमेरिकेचे आर्थिक निर्णय, जागतिक राजकीय घडामोडी आणि गुंतवणूकदारांची भूमिका या सर्व घटकांचा सोन्याच्या दरावर परिणाम होऊ शकतो.



सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी


सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी प्रत्यक्ष बाजारातील भाव जागतिक आर्थिक परिस्थिती, डॉलरची हालचाल, व्याजदर आणि मागणी यावर अवलंबून असतील.नोमुराने व्यक्त केलेला 3,500 डॉलर प्रति औंसचा अंदाज हा संभाव्य बाजारस्थितीचा अंदाज आहे. त्यामुळे भारतीय बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 23 हजार रुपयांपर्यंत येईलच, असे निश्चित मानता येणार नाही.

Comments
Add Comment

Suicide News : 'आम्हाला जगू देत नाहीत...'; पनवेलमध्ये 2 लाखांच्या कर्जापायी आईने दोन मुलांसह उचलले टोकाचे पाऊल!

Crime News: दोन लाख रुपयांच्या कर्जाच्या परतफेडीवरून वारंवार धमक्या आणि छळ होत असल्याच्या आरोपातून पनवेलमध्ये एक

आसाम सरकारचा मोठा निर्णय! एकहून अधिक विवाह केल्यास कर्मचारी नोकरीवरून थेट बडतर्फ होणार

आसाममधील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अत्यंत

Nashik : नाशिकमध्ये ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांना पोलिसांचा दणका ! कारवाईत 233 टक्क्यांनी वाढ

Nashik News : मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या बेजबाबदार चालकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी

Maharashtra Government : आदिवासी बांधवांसाठी सरकारची विशेष मोहीम; आधार कार्ड आणि जन्म दाखले मिळवून देणार

Maharashtra News: आधार कार्ड आणि जन्म दाखला यांसारखी आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे अनेक आदिवासी नागरिक शासकीय योजनांच्या

US Midterm Election : अमेरिकेत भारतीय वंशाच्या नेत्यांची बाजी ! पिया डंडिया, सुहास सुब्रमण्यम आणि अरुणा मिलर यांना मिडटर्म निवडणुकांमध्ये मोठे यश

US Midterm Election Results : अमेरिकेतील मिडटर्म निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या नेत्यांनी मोठे यश मिळवले आहे. या निवडणुकीत

Nalasopara Crime : भटक्या कुत्र्याला लाथ मारल्याच्या वादातून नालासोपाऱ्यात राडा; 30 ते 35 घरांवर जमावाचा हल्ला

Nalasopara Crime News: भटक्या कुत्र्याला लाथ मारल्याच्या आरोपातून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. नालासोपारा