आसाम सरकारचा मोठा निर्णय! एकहून अधिक विवाह केल्यास कर्मचारी नोकरीवरून थेट बडतर्फ होणार

आसाम मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बहुपत्नीत्वावर (Polygamy) पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आसाममधील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे. आसाम मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बहुपत्नीत्वावर (Polygamy) पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार, कोणताही सरकारी कर्मचारी एकापेक्षा जास्त विवाह करताना आढळल्यास त्याला त्वरित सरकारी सेवेतून बडतर्फ केले जाईल. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या निर्णयाची माहिती देताना स्पष्ट केले की, हा नवीन नियम कोणत्याही एका विशिष्ट धर्मापुरता मर्यादित नसून राज्यातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या सर्वच धर्मांतील कर्मचाऱ्यांना समान रीतीने लागू होईल. राज्यात 'समान नागरी कायदा' (UCC) लागू झालेला असल्याने हा निर्णय सर्वांवर बंधनकारक करण्यात आला आहे.


शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्तणूक आणि शिस्तविषयक नियमावलीत (Assam Service and Discipline Rules) सुधारणा करून 'कलम ७ मधील उपकलम ६' समाविष्ट करण्यात आले आहे. या सुधारणेनुसार एकपेक्षा जास्त विवाह केलेल्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून तात्काळ काढून टाकण्यात येईल. असा कर्मचारी भविष्यात कोणत्याही प्रकारच्या सरकारी नोकरीसाठी पूर्णपणे अपात्र (Disqualified) ठरेल. सरकारच्या या निर्णयामुळे प्रशासनात अधिक पारदर्शकता आणि सामाजिक शिस्त निर्माण होईल, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे.


विनाशकारी पुराच्या चौकशीसाठी CBI कडे मागणी


दरम्यान, आसाम सरकारने राज्यातील पुराच्या मुद्द्यावरही एक मोठा राजकीय आणि प्रशासकीय निर्णय घेतला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आसाममधील शिवसागर आणि चराईदेव या दोन जिल्ह्यांमध्ये आलेल्या भीषण व विनाशकारी पुरामागील अचूक कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारकडे CBI चौकशीची मागणी केली जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, येत्या १० दिवसांच्या आत केंद्र सरकारला अधिकृत पत्र पाठवले जाईल. या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवायचा की नाही, याचा अंतिम निर्णय केंद्र सरकार घेईल.

Comments
Add Comment

US Midterm Election : अमेरिकेत भारतीय वंशाच्या नेत्यांची बाजी ! पिया डंडिया, सुहास सुब्रमण्यम आणि अरुणा मिलर यांना मिडटर्म निवडणुकांमध्ये मोठे यश

US Midterm Election Results : अमेरिकेतील मिडटर्म निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या नेत्यांनी मोठे यश मिळवले आहे. या निवडणुकीत

सोमालियाच्या समुद्रात चाच्यांचा थरार! भारतीय नौदलाची धडक कारवाई; 20 जणांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली: सोमालियाच्या किनारपट्टीजवळ सशस्त्र चाच्यांनी अपहरण केलेल्या ‘अझिनी’ या मासेमारी जहाजाची भारतीय

Gold Price Fluctuation: सोन्याचे वाढते भाव यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीकडे फिरवली पाठ

Gold Price Fluctuation: गेल्या काही काळातील घडामोडींमुळे सोन्याच्या भावात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. कोरोना महामारीच्या

Whatsapp Scam: दिवाळी बोनसच्या नावाखाली मोठा स्कॅम! WhatsApp वर 8,000 रुपयांचा मेसेज व्हायरल; सावध राहा

दिवाळी जवळ येतेय आणि लोक जोमाने खरेदी करत आहेत. याच दरम्यान, WhatsApp वर एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये लोकांना ८०००

Info Edge Diwali Gift : मागच्या वर्षीची 'हिरवी बॅग' आठवतेय ? जाणून घ्या, 'इन्फोएज' कंपनीने यंदा कर्मचाऱ्यांना काय दिलं दिवाळी गिफ्ट!

नवी दिल्ली : दिवाळी आली की, प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना काय भेटवस्तू (दिवाळी गिफ्ट) देणार याची मोठी

CRPF Historic Record: ऐतिहासिक विक्रम! १२ महिन्यांत एकही जवान शहीद नाही; सीआरपीएफच्या इतिहासात सुमारे ४७ वर्षांनंतरचा विक्रम

CRPF Historic Record : केंद्रीय राखीव पोलीस दलाने म्हणजेच (सीआरपीएफने) आपल्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मागील