दिवाळी जवळ येतेय आणि लोक जोमाने खरेदी करत आहेत. याच दरम्यान, WhatsApp वर एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये लोकांना ८००० रुपये दिवाळी बोनस देण्याचा दावा केला जात आहे. जर तुम्हाला असा मेसेज आला असेल तर सावध व्हा. या बोनसच्या नावाखाली तुमची ऑनलाईन फसवणूक होऊ शकते. व्हॉट्सॲपवर फिरत असलेल्या एका संदेशात असा दावा केला जात आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीसाठी लोकांना ८००० रुपये देत आहेत. हा बोनस मिळवण्यासाठी लोकांना एक लिंक पाठवली जात आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरून ८००० रुपयांचा बोनस मिळवण्यास या संदेशात सांगितले आहे.
पण सत्य काही वेगळेच आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने हा संदेश खोटा असल्याचे घोषित केले आहे. सरकारने असा कोणताही दिवाळी बोनस जाहीर केलेला नाही. त्यामुळे जर तुम्हाला असा संदेश आला तर त्याला सत्य समजण्याची चूक करू नका. या घोटाळ्यात फसवणूक कशाप्रकारे होते हे समजून घेणं पण महत्त्वाचं आहे. घोटाळेबाज लोकांना पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवतात. त्यानंतर ते व्हॉट्सॲपद्वारे एक लिंक पाठवतात. त्या लिंकवर क्लिक केल्यावर एक वेबसाईट उघडू शकते, जिथे तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि बँकेचा तपशील विचारला जाऊ शकतो. कधीकधी घोटाळेबाज तुमचा ओटीपी आणि यूपीआय पिनदेखील मागतात. तुम्ही ही माहिती दिल्यास तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात. म्हणून ८००० रुपयांच्या नादात तुमच्या कष्टाच्या पैशांची जोखीम घेऊ नका.
मुंबई: आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आणि WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगार नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीच्या ...
या फसवणुकीपासून वाचायचे कसे?
जर तुम्हाला ८००० रुपये बोनस देणारा व्हॉट्सॲप मेसेज आला तर त्या लिंकवर क्लिक करू नका. तुमचा OTP, UPI पिन किंवा बँकेचा तपशील कोणासोबतही शेअर करू नका. सरकारी योजना नेहमी सरकारी वेबसाईटवर तपासा. जर तुमची ऑनलाईन फसवणूक झाली, तर त्याची तक्रार करण्यासाठी तात्काळ १९३० वर कॉल करा. तुम्ही cybercrime.gov.in वर देखील तक्रार दाखल करू शकता. त्यामुळे ८००० रुपयांच्या दिवाळी बोनसच्या मोहात पडू नका. थोडीशी सावधगिरी तुम्हाला मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकते.