Nitesh Rane News: रोहित पवारांनी हिंदू धर्मविरोधी सुपारी घेतली का? मंत्री नितेश राणे यांचा सवाल

Nitesh Rane On Rohit Pawar: नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या 35 हजार कोटी रुपयांच्या कामांमध्ये आठ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केल्यानंतर मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी त्यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.

मुंबई: नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या 35 हजार कोटी रुपयांच्या कामांमध्ये आठ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केल्यानंतर मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी त्यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. हिंदू सणांच्या वेळीच रोहित पवार अनियमिततेचे आरोप करतात; मात्र हज यात्रा, रमजान आणि मशिदींच्या देणग्यांमधील गैरव्यवहारांवर ते का बोलत नाहीत, असा सवाल करत त्यांनी रोहित पवारांनी हिंदू धर्मविरोधी भूमिका घेण्याची सुपारी घेतली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना राणे यांनी एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या मुघलांविषयीच्या वक्तव्यावरूनही टीका केली.



रोहित पवार यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, “आज रोहित पवार हज यात्रेच्या बाबतीत आपले तोंड उघडणार नाहीत का? तिथे त्यांना सगळ्या अनियमितता दिसत नाहीत? रमजानच्या पूर्ण महिन्यात मोहल्ल्यांमध्ये जो काही धिंगाणा घातला जातो, त्यावर रोहित पवार बोलताना किंवा बडबडताना आम्हाला कधी दिसलेले नाहीत. यांना फक्त हिंदू सणांच्या वेळी हिंदू धर्माच्या विरोधात भूमिका घेण्यासाठीच सुपारी मिळाली आहे का, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कारण त्यांची भूमिका फक्त आमच्या कुंभमेळ्याच्या संदर्भात असते. हज यात्रा आणि अन्य लोकांच्या यात्रांच्या बाबतीत किंवा रमजानच्या वेळी रोहित पवार कधी बोलताना मी ऐकलेले नाहीत. पश्चिम बंगालमधील एका मशिदीत पैशांची अनियमितता झाली, बाबरी मशीद पश्चिम बंगालमध्येही बांधली जात आहे आणि तिच्या देणगीमध्ये अनियमितता झाल्याचे समोर आले, तेव्हा रोहित पवार का बोलले नाहीत?”



एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांनी मुघलांनी बांधलेल्या वास्तू आजही दिमाखात उभ्या असल्याचे आणि हिंदी चित्रपटांमधून हा इतिहास विसरला जाऊ शकत नसल्याचे वक्तव्य केल्याबाबत विचारले असता राणे म्हणाले, “तिला आता इकडे हिरवेकरण करण्यासाठी सुपाऱ्या दिलेल्या आहेत ना? मुघलांची एवढी आठवण येत असेल तर तिने पाकिस्तानमध्ये निघून जावे. असे लोक आम्हाला आमच्या देशात नकोत. मुघलांची एवढी आठवण येत असेल तर वडिलांना घेऊन मुघलांकडे जाऊन बसली तरी आम्हाला काय हरकत आहे? मुघलांच्या वास्तूंचे कौतुक करण्यापेक्षा शिवरायांनी उभारलेल्या अनेक वास्तूंची आठवण ठेवली पाहिजे. ती हिंदू राष्ट्रात निवडून आली आहे, हे कदाचित विसरली असेल. त्याच मुघलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आहे. ती ज्या भूमीवर उभी आहे, ती महादेवाची भूमी आहे, हिंदू राष्ट्र आहे. कोणाच्या अब्बाची पाकिस्तानची भूमी नाही, हे तिने लक्षात ठेवावे. नाहीतर अशी पार्सल आम्हाला पाकिस्तानमध्ये पाठवता येतात”, असा इशाराही मंत्री राणे यांनी दिला.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना दूरध्वनी करून त्यांची विचारपूस केल्याच्या आणि त्यांना विश्रांती घेण्यास सांगितल्याच्या चर्चेबाबत विचारले असता राणे म्हणाले, “हाच तर आमच्या पंतप्रधानांचा मोठेपणा आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध आणि नाती कशी टिकवायची, याचा आदर्श मोदी साहेबांनी देशासमोर आणि आमच्या सगळ्यांसमोर ठेवलेला आहे. म्हणूनच ते आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत."



देवभाऊंचे सरकार मश्चिमारांच्या पाठीशी


मच्छिमारांच्या कर्जमाफीबाबत विचारले असता राणे म्हणाले, “आपल्या राज्यामध्ये मासेमारीला कृषीचा दर्जा दिलेला आहे. आपल्या देशात मासेमारीला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ज्या ज्या सवलती, जी जी मदत आणि जी जी कर्जमाफी मिळणार आहे, ती सर्व मासेमारी करणाऱ्यांनाही आणि मच्छिमारांनाही मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी निश्चिंत राहावे. मत्स्यबीजाच्या बाबतीतही राज्य सरकार त्यांना मदत करण्याच्या तयारीत आहे. कालच केंद्र सरकारने एनडीआरएफचे नियम मच्छिमारांसाठी बदलून मदतीचे निकष वाढवले आहेत. आतापर्यंत मिळणारी मदत तुटपुंजी होती, ती मच्छिमारांसाठी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील मच्छिमारांच्या पाठीशी केंद्र सरकार आणि देवाभाऊंचे सरकार पूर्ण ताकदीने उभे आहे”, असा विश्वासही मंत्री नितेश राणे यांनी दिला.

Comments
Add Comment

महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे:  चाकण येथे मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री

कोअर कमिटीला विचारल्याशिवाय राष्ट्रवादीत यापुढे कोणताही निर्णय नाही! - पार्थ पवारांचा वरिष्ठ नेत्यांना शब्द

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या पक्षाच्या कोअर

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरणाची नांदी

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्याच्या राजकारणात एक नवे समीकरण

Ramdas Athawale: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं राहुल गांधींवर टीकास्त्र

केंद्र सरकारमधील घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय

मंत्रिमंडळाचे १२ मोठे निर्णय; विद्यार्थी, वाहनधारक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित १२ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले

PM Modi and Sharad Pawar: नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, 'देशाकडे लक्ष देण्यासाठी... तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या..

PM Modi and Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व जेष्ठ नेते शरद पवार यांना रुबी रुग्णालयातून आज