कोअर कमिटीला विचारल्याशिवाय राष्ट्रवादीत यापुढे कोणताही निर्णय नाही! - पार्थ पवारांचा वरिष्ठ नेत्यांना शब्द

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी कोअर कमिटीला विश्वासात घेऊनच यापुढे महत्त्वाचे निर्णय घेण्याची ग्वाही दिल्याची माहिती समोर आली आहे. झिशान सिद्दीकी आणि उमेश पाटील यांच्या नियुक्त्या कायम ठेवण्यात आल्या असून, सहा महिन्यांनंतर त्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. मात्र, पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या पदांबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांनी यापुढे महत्त्वाचे निर्णय घेताना कोअर कमिटीला विश्वासात घेण्याची ग्वाही दिल्याचे समजते. अलीकडेच पक्षातील काही नियुक्त्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता करण्यात आल्याने नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत वादावर पूर्णपणे तोडगा निघाला नसला, तरी यापुढे सामूहिक विचारविनिमयातून निर्णय घेण्याची भूमिका पार्थ पवार यांनी मांडल्याची माहिती आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक बुधवारी मुंबईत झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांमुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. विशेषतः पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील काही वरिष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा होती.


पार्थ पवार यांच्या आदेशाने अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दीकी आणि राष्ट्रीय प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्त्या करताना कोअर कमिटीला विश्वासात घेतले नसल्याने वरिष्ठ नेत्यांच्या गटात नाराजी होती. त्यामुळे या नियुक्त्यांचा फेरविचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, बुधवारी झालेल्या बैठकीत या नियुक्त्या कायम ठेवण्याचे स्पष्ट झाले. झिशान सिद्दीकी मुंबई अध्यक्ष, तर उमेश पाटील मुख्य प्रवक्ते म्हणून पुढील सहा महिने काम पाहतील. या कालावधीत त्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका पार्थ पवार यांनी मांडल्याचे समजते.



अंतर्गत वाद शमला का?


बैठकीत पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी पक्षांतर्गत वादावर सार्वजनिक भाष्य करणे टाळले. मात्र, यापुढे कोअर कमिटीशी चर्चा करूनच निर्णय घेतले जातील, असा शब्द पार्थ पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे नियुक्त्यांवरून निर्माण झालेली नाराजी काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांचे प्रदेशाध्यक्षपद आणि प्रफुल्ल पटेल यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्षपद याबाबतचा संभ्रम अद्याप कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेदांवर पूर्णविराम लागलेला नसल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

न्यूझीलंडच्या 11व्या क्रमांकाच्या खेळाडूसोबत गुरनूर ब्रारचा राडा! बाद करण्यासाठी अशी क्लुप्ती वापरली Video

भारताने न्यूझीलंडला पहिल्या वनडे सामन्यात 5 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात न्यूझीलंडने फक्त 185 धावांचं

फास्ट ट्रॅक न्यायालयांचा मोठा विस्तार! देशात 850 विशेष न्यायालये उभारण्यास केंद्राची मंजुरी; 5 वर्षांची मुदतवाढ

नवी दिल्ली: देशभरात बलात्कार आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार (पॉस्को) प्रकरणांना चाप लावण्यासाठी आणि खटल्यांची

Diwali Cleaning: दिवाळीसाठी करा एका दिवसात साफसफाई; कशी ते जाणून घेऊया

Diwali Cleaning: दिवाळीला अवघे काही तास उरले आहेत. परंतु अजूनही घराची साफसफाईही करायची बाकी आहे, वेळ कमी असल्यामुळे धावपळ

हिमालयात साकारतेय औषधी वनस्पतींचं विश्व! हर्बल कुंभ 2026 चा भव्य शुभारंभ; धन्वंतरि धाम बनणार जागतिक आयुर्वेद केंद्र

[caption id="attachment_1072223" align="aligncenter" width="800"] उत्तराखंडच्या हिमालयीन परिसरात हर्बल कुंभ, जडी-बुटी कृषी मेळा आणि धन्वंतरि महोत्सव 2026

विराट-अर्शदीपवर भारी पडला 25 वर्षांचा गोलंदाज! फक्त 2 विकेट्स घेत अंशुलने कसा हिसकावला सामनावीरचा किताब?

[caption id="attachment_1072203" align="aligncenter" width="800"] भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या

महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे:  चाकण येथे मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाच्या लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री