
मुंबई: पश्चिम रेल्वेने सणासुदीच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे नागरिक सणासुदीनिमित्त आपल्या गावी जात असतात. गावी जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने सहा प्रमुख रेल्वे स्थानकांवर 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत, प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री न करण्याचा तात्पुरता निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी येणाऱ्या सहप्रवाशांना आळा बसणार आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी लक्षात घेता, रेल्वेनेहा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई: प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने मंदिरालगतची राम मॅन्शन सहकारी ...
दिवाळी आणि आगामी छठ पूजेच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने वांद्रे टर्मिनस, वापी, वलसाड, उधना, सुरत आणि भेस्तान या सहा प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवणे, प्लॅटफॉर्मवरील कोंडी कमी करणे, रेल्वेच्या कामकाजात सुसूत्रता राखणे, वैध तिकीट असलेल्या प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि प्रवाशांना रेल्वेमध्ये चढणे-उतरणे सुलभ व्हावे, या उद्देशाने ही खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे.
मुंबई: मुंबईतील नारायण हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये एका वर्षाच्या बाळावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. सहा किलो वजनाच्या एक ...
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सणासुदीच्या काळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन, सणासुदीच्या काळात, जे लोक प्रवास करत नाहीत, परंतु प्रवाशांना सोडायला किंवा घ्यायला येतात, त्यांच्या उपस्थितीमुळे प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी आणि प्रवाशांची ये- जा सुरळीत राहावी, यासाठी संबंधित स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे, जेणेकरून प्लॅटफॉर्मवरील गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल.
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी चिपी ते नवी मुंबई विमानसेवा आता दररोज सुरू होणार आहे. ...
ज्येष्ठ नागरिक, वैद्यकीय समस्या असलेले प्रवासी, गर्भवती महिला आणि ज्यांना विशेष शारीरिक मदतीची गरज आहे, त्यांना या निर्बंधांतून सवलत देण्यात आली आहे, जेणेकरून त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये. प्रवाशांनी सणासुदीच्या काळामध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर विनाकारण गर्दी करू नये आणि रेल्वे प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेने सर्व प्रवाशांना केले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर होण्यास मदत होईल.



